Delhi Capitals has Not Retained Rishabh Pant for The Upcoming Season and Delhi has Retained a Total of 4 Player
IPL 2025 Mega Auction : IPL 2025 च्या लिलावासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दिल्ली कॅपिटल्समधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने आपले मौन सोडले आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या सुनील गावस्करांच्या मुलाखतीला रिट्विट करीत असताना, त्याने दिल्ली कॅपिटल्सपासून वेगळे होण्याचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ऋषभ पंतने सोशल मीडियाच्या मदतीने हे आपले मत मांडले आहे. पंतने हे थेट सोशल मीडियावर लिहिलेले नाही. तर, सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात या विषयावर भाष्य करताना पाहून त्यांनी आपले मत व्यक्त केले. सोप्या भाषेत सांगायचे तर ऋषभने सुनील गावस्कर यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले सुनील गावस्कर ऐका
The curious case of Rishabh Pant & Delhi! 🧐
🗣 Hear it from #SunilGavaskar as he talks about the possibility of @RishabhPant17 returning to the Delhi Capitals!
📺 Watch #IPLAuction 👉 NOV 24th & 25th, 2:30 PM onwards on Star Sports Network & JioCinema! pic.twitter.com/ugrlilKj96
— Star Sports (@StarSportsIndia) November 19, 2024
ऋषभ पंतने दिल्लीत कायम न राहण्यावर सोडले मौन
आयपीएल लिलावाअगोदर सर्व खेळाडू आपले वर्चस्व दाखवून आपली प्रबळ दावेदारी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कायम का ठेवले नाही या मुद्द्यावर सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर भाष्य करीत होते. या कार्यक्रमात गावस्कर म्हणाले की, पंतला कायम न ठेवणे ही मॅच फीशी संबंधित समस्या असू शकते. गावस्कर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर पंत यांनी X हँडलवर सांगितले की, किमानतरी माझ्या दृष्टीने हा पैशाशी संबंधित विषय नाहीये,
माझ्या टिकून न राहण्याचा पैशाशी काही संबंध नाही
कार्यक्रमाच्या व्हिडिओला उत्तर देताना ऋषभ पंतने लिहिले – एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की, दिल्ली कॅपिटल्समधून बाहेर पडण्याचा पैशाशी काहीही संबंध नाही.
ऋषभ पंतच्या जागी दिल्लीने अक्षर पटेलला केले कर्णधार
दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन IPL 2025 साठी एक नवीन संघ तयार करण्याच्या तयारीत आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आपला कर्णधार ऋषभ पंतलाही सोडले आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, दिल्ली कॅपिटल्सने IPL 2025 साठी आपला कर्णधार निश्चित केला आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली आता ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण वृत्तांच्या मार्फत ही माहिती समोर आली होती.
हेही वाचा : पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये भीषण आग; चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत PCB पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात
हेही वाचा : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हाती लागणार? ऋषभ पंतची जागा कोण घेणार?