Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : मिस्टर 360 की Nicholas Pooran, कोण फलंदाज उत्तम? टी-२० आणि IPL च्या आकडेवारीने दिले ‘हे’ उत्तर.. 

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत ४२ सामने पार पडले आहेत. या हंगामात खेळाडूंमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. सूर्यकुमार यादव आणि निकोलस पूरन या दोन फलंजांमध्ये कोण अधिक उत्तम फलंदाज? अशी स्पर्धा सुरू झाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 25, 2025 | 12:55 PM
IPL 2025: Mr. 360 or Nicholas Pooran, who is the better batsman? T20 and IPL statistics give 'this' answer..

IPL 2025: Mr. 360 or Nicholas Pooran, who is the better batsman? T20 and IPL statistics give 'this' answer..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम अर्ध्यावर आला असून आतापर्यंत ४२ सामने पार पडले आहेत. गुणतालिकेत देखील मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. अशातच खेळाडूंमध्ये देखील स्पर्धा रंगली आहे. त्यातच मिस्टर ३६० म्हणून ज्याला ओळखले जाते, तो  म्हणजे सूर्यकुमार यादव हा भारतासाठी टी-२० मधील सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. टी-२० फॉरमॅटमध्ये कधीही सामना एकहाती  फिरवण्याची क्षमता सूर्याकडे आहे. त्याच वेळी, कॅरिबियन खेळाडू निकोलस पूरन देखील टी-२० फॉरमॅटमधील तगडा फलंदाज मनाला जातो. आयपीएल २०२५ मध्ये त्याचा कहर बघायला मिळत आहे. या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरत असतो. त्याने आयपीएल २०२५ मध्ये अनेक स्फोटक खेळी खेळून संघाला विजयी केले आहे.

तसेच, सूर्यकुमार यादव देखील आयपीएल २०२५ गाजवत आहे. त्याचाय बॅटमधून देखील खोऱ्याने धावा निघत आहेत. याशिवाय, या वर्षी या दोघांमध्ये देखील ऑरेंज कॅपसाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या दोघांमध्ये नेमका कोण चांगला फलंदाज आहे? जाणून घेऊया त्यांची  टी-२० मधील आकडेवाडी.

हेही वाचा : IPL 2025 : आता Babar Azam ला विसरा, Virat Kohli च ठरला ‘टी-20 किंग’, ‘या’ बाबतीत बनला जगातील नंबर-१ फलंदाज..

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणून देखील ओळखले जाते. आतापर्यंत त्याने एकूण १५९ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने ३३ च्या सरासरीने आणि १४७ च्या स्ट्राईक रेटने ३,९६७ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच वेळी, टी-२० मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०३ आहे. सूर्याने टी-२० मध्ये दोन शतके देखील झालकवली आहेत. एकूणच, तो टी-२० मध्ये चार हजार धावा करण्याच्या अगदी ऊंबरठ्यावर आहे.

निकोलस पूरन

निकोलस पूरनची टी-२० कारकीर्द सूर्यकुमार यादवपेक्षा कमी राहिलेली आहे. तो आतापर्यंत एकूण ८५ टी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने १६८ च्या स्ट्राईक रेटने २,१४६ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ अर्धशतकांचा समावेश आहे. धावांच्या बाबतीत, पूरन सूर्यकुमार यादवपेक्षा मागे असल्याचे दिसून येत आहे. जरी त्याचे सामने कमी आहेत. परंतु, जर आपण या दोन्ही खेळाडूंमधील फरकाबद्दल बोललो तर ते फारसे नसल्याचेही दिसते.

हेही वाचा : ‘देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही..’, Arshad Nadeem ला भारताच्या आमंत्रणांवरून Neeraj Chopra ने केली वेदनेला वाट मोकळी..

आयपीएल २०२५ मधील दोघांची कामगिरी

सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने ६६ च्या सरासरीने आणि १५६ च्या स्ट्राईक रेटने ३७३ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, ६६ हा त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.  त्याच वेळी, निकोलस पूरनने ९ सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने आणि २०४ च्या स्ट्राईक रेटने ३७७ धावा केल्या असून आयपीएल २०२५ मध्ये निकोलस पूरन हा सूर्यकुमार यादवच्या पुढे असल्याचे दिसून येते.

Web Title: Ipl 2025 suryakumar yadav or nicholas pooran who is the better batsman know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • Nicholas Pooran
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
1

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
2

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
3

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
4

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.