विराट कोहली आणि बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 18 व्या हंगामातील ४२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा धावांनी पराभव केला. आरआरचा कर्णधार रायन परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर आरसीबीला प्रथम फलंदाजी करत विराट कोहलीने अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात आरआर 194 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी आपल्या घरच्या मैदनावार आरसीबीने आरआरला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकाने महत्वाची भूमिका बजावली. या अर्धशतकासह त्याने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सामन्यात वेगवान खेळी केली. विराटने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात त्याने 42 चेंडूचा सामना करत ७० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लागवले आहेत. या उत्कृष्ट खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला आहे.
आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध ७० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीने पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचा विक्रम मोडला आहे. विराट कोहली आता प्रथम फलंदाजी करताना टी-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा फलंदाज बनला आहे. यासह, विराट कोहलीने धावांचा पाठलाग करत असताना ६२ अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमच्या नावे नोंदवला गेला होता. धावांचा पाठलाग करताना त्याने ६१ अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा : RCB vs RR : Yashasvi Jaiswal चा IPL मध्ये भीम पराक्रम, अनोखा विक्रम करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज..
काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या(42 चेंडू 70 धावा) जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना या सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.