नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम(फोटो-सोशल मीडिया)
Pahalgam Terrorist Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. सर्वच क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशभर शोकाचे वातावरण आहे. भारत सरकारने यावर कारवाई करण्यास पाऊले उचलले आहेत. या हल्ल्यापूर्वी भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राकडून एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला भारतात येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. परंतु, अर्शदने या स्पर्धेत येण्यास नकार दिला. नीरज चोप्राचे हे आमंत्रण त्याच्यावर ओझ वाटत होते. त्याला अनेक द्वेषपूर्ण संदेशांना सामोरे जावे लागले आहे. अखेर आता नीरज चोप्राने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नीरज चोप्राने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी सहसा कमी बोलतो. पण याचा अर्थ असा नाही की मी जे चुकीचे आहे त्याविरुद्ध बोलणार नाही. विशेषतः जेव्हा आपल्या देशावरील प्रेम आणि माझ्या कुटुंबाच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्शद नदीमला नीरज चोप्रा क्लासिकमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातील बहुतेक द्वेष आणि शिव्याच आहेत.’
हेही वाचा : RCB vs RR : Yashasvi Jaiswal चा IPL मध्ये भीम पराक्रम, अनोखा विक्रम करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज..
चोप्रा स्पष्ट शब्दात बोलला की, देशापेक्षा काहीही एक महत्त्वाचे नाही आणि भारताच्या प्रतिष्ठेशी आणि सन्मानाशी कधीही तडजोड करणार नाही. त्यानंतर चोप्राने लिहिले की, त्यांनी माझ्या कुटुंबाला देखील त्यातून वगळले नाही. मी अर्शदला जे आमंत्रण दिले ते एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला दिले होते. यामध्ये जास्त काही नाही, कमी काही नाही. एनसी क्लासिकचे उद्दिष्ट सर्वोत्तम खेळाडूंना भारतात घेऊन येणे आणि आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे घर बनवणे आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी सर्व खेळाडूंना निमंत्रण पाठवले होते.
गेल्या ४८ तासांत जे काही घडून गेले आहे. त्यानंतर, एनसी क्लासिकमध्ये अर्शदच्या उपस्थितीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझा देश आणि त्याचे हित नेहमीच प्रथमस्थानी असेल. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या लोकांसोबत आहेत जे त्यांच्या लोकांना गमावून बसले आहेत. संपूर्ण देशात जे घडले आहे, त्याबाबत मी दुखावलो आहे आणि रागावलो आहे. मला विश्वास आहे की, आपल्या देशाचा प्रतिसाद हा एक राष्ट्र म्हणून आपली ताकद नक्की दाखवेल आणि न्याय मिळेल.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 25, 2025
चोप्रा पुढे म्हणाला की, मी इतकी वर्षे अभिमानाने माझ्या देशाची सेवा केली आहे, त्यामुळे माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे पाहून दुःख होत आहे. जे लोक मला आणि माझ्या कुटुंबाला कोणतेही ठोस कारण नसताना देखील लक्ष्य करत आहेत त्यांना स्वतःचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे, हे मला खूप वेदनादायी आहे. आम्ही साधे लोक आहोत, कृपया आम्हाला काही समजावू नका.
हेही वाचा : IPL 2025 : आता Babar Azam ला विसरा, Virat Kohli च ठरला ‘टी-20 किंग’, ‘या’ बाबतीत बनला जगातील नंबर-१ फलंदाज..
अर्शद नदीमने एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेत खेळण्यास नकार दर्शवला आहे. तो म्हणाला की ही स्पर्धा २४ मे पासून भारतात सुरू होता आहे. तर तो २२ मे रोजी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी कोरियाला रवाना होणार आहे. २७ ते ३१ मे दरम्यान कोरियामध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी तो मेहनत घेत असल्याचे त्याने सांगितले.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारतासाठी सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले. त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय, त्याच्याकडे डायमंड लीगचे जेतेपद देखील आहे. त्याने आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमध्येही तिरंगा फडकवला आहे. त्याचा सर्वोच्च थ्रो ८९.९४ मीटर आहे.