IPL 2025: Vaibhav Suryavanshi's luck paid off! He became the winner of 'Super Striker', received so much money along with a Tata Curve car..
PBKS vs RCB : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला काल म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात तब्बल १८ वर्षानंतर पंजाब किंग्जला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल टायटल जिंकले आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. तर पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. या सामन्यानंतर राजस्थानचा वैभव सूर्यवंशी चर्चेत आला आहे. त्याला आयपीएल २०२५ चा ‘सुपर स्ट्रायकर’ पुरस्कार मिळाला आहे.
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करत पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या हंगामात वैभवने सर्वाधिक स्ट्राइक रेट आणि टाटा कर्व्ह कारसह धावा करण्याचा किताब देखील पटकवाला आहे. वैभवला सुपर स्ट्रायकर पुरस्कार म्हणून १० लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले.
वैभवने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून ७ सामने खेळले आहेत. या ७ सामन्यांच्या ७ डावात वैभवने २०६.५५ च्या स्ट्राइक रेटश २५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १८ चौकार आणि २४ षटकार मारले आहेत. वैभवला पहिल्या ७ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर, मात्र जेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा : Virat Kohli: ‘मला उदास आणि निराश पाहणं अनुष्कासाठी…’ IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट झाला भावूक
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात वैनभव सूर्यवंशी हा अनेक दिग्गजांमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभवने पहिला क्रमांकावर पटकवला आहे. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन दुसऱ्या स्थानावर राहीला आहे. त्याने या हंगामात १९६.२५ च्या स्ट्राईक रेटने ५२४ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने या हंगामात १९३.३९ च्या स्ट्राईक रेटने ४३९ धावा काढल्यात आहेत.
वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावून क्रीडा जगताला आश्चर्यचकित केले होते. या दरम्यान त्याने ७ चौकार आणि ११ षटकार लगावले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक पूर्ण करणारा वैभव पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. या शतकावेळी त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडला होता.