विराटने पत्नीबाबत केल्या भावना व्यक्त
पहिल्यांदाच आयपीएल जिंकल्यानंतर (IPL 2025, RCB vs PBKS) अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत जोरदार आनंद साजरा केला, तर विजयानंतर नेहमीप्रमाणे विराट सर्वात पहिल्यांदा आपली पत्नी अनुष्काकडे गेला आणि मिठी मारली. कोहलीने अनुष्का शर्माच्या पाठिंब्याबद्दल सर्वांसमोर आपले मन मोकळे केले आणि म्हटले की आज जे काही घडले त्याचे श्रेय पत्नी अनुष्का शर्माला जाते.
विजयानंतर काही क्षणांतच विराट कोहलीने अनुष्का शर्माने पडद्यामागे दिलेल्या ‘पाठिंब्या आणि त्यागा’बद्दल सांगितले, ज्यामुळे त्याला मैदानावरील त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या त्याच्या १८ व्या वर्षात, मंगळवारी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील त्याच्या संघाने अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा पराभव करून कोहलीने अखेर आयपीएल जिंकले. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना, कोहलीने १८ वर्षांनंतर आयपीएल जिंकण्यात अनुष्काच्या भूमिकेचे श्रेयही दिले. कोहली म्हणाला, “आम्हाला हरताना पाहणे… तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी काय करतो – त्याग, वचनबद्धता आणि प्रत्येक कठीण काळात तुम्हाला पाठिंबा देणे… ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही शब्दात मांडू शकत नाही.”
विराटने भावूक होत केले मत व्यक्त
ब्रॉडकास्टर्सशी बोलताना, कोहलीने अनुष्काला १८ वर्षांनंतर आयपीएल जिंकल्यानंतर तिच्या भूमिकेचे श्रेय दिले. कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही व्यावसायिकपणे खेळता तेव्हाच तुम्हाला पडद्यामागे घडणाऱ्या अनेक गोष्टी आणि ती कोणत्या परिस्थितीतून जाते हे समजते.. अनुष्का भावनिकदृष्ट्या कोणत्या टप्प्यातून गेली आहे हे पाहणे.. मला दुःखी आणि निराश पाहून, सामन्यांना येताना, बंगळुरूशी इतके जोडलेले आणि नेहमीच आरसीबीसोबत राहणे.. हे तिच्यासाठी खूप खास आहे आणि तिला याचा खूप अभिमान असेल.. धन्यवाद.”
विराटचे आनंदाश्रू
विराट आणि अनुष्का खास नाते
विराट आणि अनुष्का गेले कितीतरी वर्ष एकत्र आहेत आणि गर्लफ्रेंड ते बायको हा प्रवास विराटसह अनुष्काने केलाय. त्याच्या प्रत्येक सामान्यात त्याच्यासह खंबीरपणे तिने त्याला साथ दिली आहे आणि याशिवाय विराटलाही नेहमीच मॅच खेळल्यानंतर अनुष्कासह संभाषण करताना पाहिले गेले आहे. ही क्रिकेट विश्वासतली सर्वात आदर्श जोडी मानली जाते. त्यामुळे १८ वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएल जिंकणे हे विराट आणि अनुष्कासाठी अत्यंत खास क्षण असल्याचे दिसून आले.
पहिल्यांदाच जिंकली आरसीबी
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर आरसीबीने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकांत ९ गडी बाद १९० धावा केल्या, त्यानंतर पंजाब किंग्ज संघ २० षटकांत ७ गडी बाद १८४ धावाच करू शकला. आरसीबीने हा सामना ६ धावांनी जिंकण्यात यश मिळवले. कृणाल पंड्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. तर पहिल्यांदाच १८ वर्षात RCB ने ट्रॉफी पटकावली आहे.