IPL 2025 : आयपीएल २०२५ चा 18 वा हंगाम आपल्या बॅट गाजवणारा वैभव सूर्यवंशी सतत चर्चेत आहे. या १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची ओळख आता क्रीडा विश्वाला झाली आहे. या तरुण फलंदाजासाठी हे वर्ष संस्मरणीय असेच राहिले आहे. चालू हंगामात त्याच्या दमदार खेळीमुळे वैभवने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. यामुळेच त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या हंगामात वैभव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. अशातच त्याच्याबद्दल एक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल एक फोटो व्हायरला झाला आहे. यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी कर्नल सोफिया कुरेशीसोबत असलेले दिसत आहेत. आता असा देखील दावा करण्यात येत आहे की, वैभव सोफिया कुरेशीला भेटला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी आणि कर्नल सोफिया कुरेशी एकत्र दिसून येत आहेत. हा फोटो पाहून असे वाटते की हा कोणत्याही कार्यक्रमादरम्यान काढलेला दिसत नाही. त्याच वेळी, या दोघांमधील भेटीचे कोणतेही पुरावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. यावरून असे दिसून येत आहे की, हा फोटो खरा नाही.
यामागील सत्य असे की, फोटोमध्ये एआय वापरून छेडछाड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की असे फोटो यापूर्वी देखील खूप वेळा व्हायरल झाले आहेत. याआधी देखील पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटासोबतचा त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला होता. या फोटोप्रमाणेच तो फोटो देखील बनावट असल्याचे नंतर उघड झाले होते.
हेही वाचा : विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. त्यांनंतर कर्नल सोफिया यांना भारतातच नाही तर संपूर्ण जगात ओळख मिळाली. त्या भारतीय सैन्यामध्ये एक सन्मानित अधिकारी आहेत. त्या भारतातील गुजरातमधील बडोदा शहरातील रहिवासी असून अलिकडेच त्यांनी जगासमोर पाकिस्तानबद्दलचे सत्य मांडले होते. पहलगाम हल्ल्यानंतर, तो टीव्हीवर लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल माहिती देताना दिसून आल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २३० धावंचा डोंगर उभा केला होता. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने जबरदस्त सुरुवात करून दिली होती. त्याने १७ चेंडूत ३४ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर, उर्विल पटेलने १९ चेंडूत ३७ धावा, शिवम दुबेने १७ आणि रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. याशिवाय दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. डेव्हॉन कॉनवेने ३५ चेंडूत ५२ धावा उभारल्या. तर शेवटी, ब्रेव्हिसने आपली जादू दाखवत ५७ धावा करून संघाला २३० धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १४७ वर सर्वबाद झाला.