विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल २५ मे रोजी अयोध्या शहरात पोहोचले. यावेळी चाहत्यांना अनुष्का- विराटची पुन्हा एकदा आध्यात्मिक बाजू पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी हे सेलिब्रिटी कपल वृंदावनमध्ये गेले होते. त्याठिकाणी त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. त्यानंतर आता विराट- अनुष्काने अयोध्येतील हनुमानाचे आणि प्रभू श्री रामाचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अचानक अयोध्येमध्ये अनुष्का आणि विराट दिसल्यामुळे चाहते आनंदित झाले आहेत.
डिजिटल दुनियेतली मस्ती ‘त्या’ तिघांच्या अंगलट येणार का ? ‘आंबट शौकीन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
२३ मे रोजी लखनौच्या एकाना स्टेडियमवर कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल सामना खेळला. त्यात आरसीबी ४२ धावांनी पराभूत झाली. या मॅचनंतर क्रिकेटर आपल्या पत्नीसोबत अयोध्येमध्ये पोहोचला. सकाळी ७ वाजताच विराट पत्नीसोबत पहिल्यांदाच कारने अयोध्याला पोहोचला. सकाळी सात वाजता दोघांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात फेर फटका मारल्यानंतर पुजाऱ्यांकडून राम मंदिराच्या मूर्ती आणि कोरीवकामाची माहिती घेतली. यानंतर विराट आणि अनुष्का हनुमानगढीला पोहोचले. २० मिनिटे दर्शन-पूजा केली. त्यानंतर लखनऊला निघून गेले.
Uttar Pradesh: Indian Cricketer Virat Kohli, along with his wife and actor Anushka Sharma, visited and offered prayers at Hanuman Garhi temple in Ayodhya, earlier today.
(Pic Source: Hanuman Garhi temple) pic.twitter.com/icCPHNb1bR
— ANI (@ANI) May 25, 2025
विराट आणि अनुष्का सकाळी आठ वाजता हनुमानगढी मंदिरात पोहोचले. विराटने सव्वा किलो लाडू आणि फुलांचा हार हनुमानाला अर्पण केला. थोडा वेळ हात जोडून उभे राहिले. यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला पांढऱ्या आणि लाल फुलांच्या दोन हार घालायला लावले. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर अनुष्काला दोन पिवळ्या हार घालायला लावला आणि तिलाही आशीर्वाद दिला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महंतांनी दोघांनाही शाल दिली. विराट-अनुष्काच्या अयोध्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे समोर आले. यावेळी दोघेही पारंपरिक पोशाखात दिसून आले. अनुष्काने पेस्टल गुलाबी रंगाचा एथनिक ड्रेस परिधान केला आहे, तर विराट बेज रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला. विराट आणि अनुष्का मंदिरात मनोभावे पूजा करताना दिसले. त्यावेळी मंदिराचे पुजारी आणि सुरक्षा कर्मचारी त्यांच्या आजुबाजूला उभे होते.
#UttarPradesh #Ayodhya #Hanumangadi #ViratKohli #AnushkaSharma
भारतीय क्रिकेटर विराट कोहली और अभिनेत्री अनुष्का शर्मा ने अयोध्या के हनुमान गढ़ी मंदिर में दर्शन किए, हनुमानगढी के महंत संजय दास से की मुलाकात, हनुमानगढी के वरिष्ठ पुजारी हेमंत दास ने कराया अनुष्का शर्मा और विराट… pic.twitter.com/aZv9pddOIQ— सिरोही की आवाज (@Sirohikiaawaz) May 25, 2025