Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

IPL 2026 मध्ये गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. आरसीबी आणि हैदराबादची घसरण झाली असून मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 08:10 AM
IPL 2026 Points Table (Photo Credit- X)

IPL 2026 Points Table (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ!
  • दोन संघांना बसला फटका
  • ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात सध्या कमालीचा रोमांच पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संघांनी अशा प्रकारे पुनरागमन केले आहे की, प्रस्थापित संघांची गणिते बिघडली आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (GT) जबरदस्त कामगिरी करत गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामुळे अव्वल चारमधील चुरस वाढली असून दोन प्रमुख संघांना आपले स्थान गमवावे लागले आहे.

हैदराबादचा पराभव आणि गुजरातचे ‘कमबॅक’

मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर (SRH) दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच गुजरातचे आता 8 विजयांसह 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. सलग पाच सामन्यांत विजय मिळवून गुजरातने आपले प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. कर्णधार शुभमन गिलच्या आक्रमक नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदारी सादर केली आहे.

Gujarat Titans are the new table toppers with 8 wins and a strong net run rate! 💙🔼#IPL2026 #GTvSRH #Sportskeeda pic.twitter.com/9rRbSdpapD — Sportskeeda (@Sportskeeda) May 12, 2026

RCB आणि हैदराबादची घसरण; नेट रनरेटचा फटका

गुजरातच्या या मुसंडीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांना मोठा फटका बसला आहे. यापूर्वी अव्वल स्थानी असलेल्या आरसीबीला आता दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. आरसीबी आणि हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण आहेत, मात्र सरस नेट रनरेटच्या जोरावर आरसीबी दुसऱ्या, तर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, मात्र सलग चार पराभवांमुळे पंजाबच्या प्लेऑफ प्रवेशावर टांगती तलवार आहे.

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

CSK आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत कायम

गुणतालिकेत सध्या अव्वल चारच्या बाहेर असले तरी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) अजूनही शर्यतीत कायम आहेत. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 12 गुण असून, पुढील एका विजयामुळे त्यांचे 14 गुण होतील. यामुळे अव्वल चारमधील समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात. चेन्नई आणि राजस्थानच्या अनुभवामुळे प्लेऑफची ही लढाई शेवटच्या सामन्यापर्यंत रंगण्याची चिन्हे आहेत.

मुंबई आणि लखनौ बाहेर; आज आरसीबीला पुन्हा संधी

सध्याच्या स्थितीनुसार, पाचवेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. मुंबई 9 व्या तर लखनऊ 10 व्या स्थानावर संघर्ष करत आहेत. आज आयपीएलमध्ये आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. जर आरसीबीने आज विजय मिळवला, तर त्यांना पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. दुसरीकडे, केकेआरला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे; अन्यथा त्यांचाही या हंगामातील प्रवास संपुष्टात येईल. त्यामुळे आजचा सामना गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

Web Title: Ipl 2026 points table update gujarat titans reaches number one spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • cricket news
  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • IPL Point Table

संबंधित बातम्या

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
1

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
3

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
4

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.