Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा सामना; पावसामुळे नाणेफेक लांबणीवर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी नाणेफेक सकाळी साडेसातला होणार होती. मात्र, पाऊस पडत असल्याने टॉस अद्याप झाला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 10, 2026 | 07:59 AM
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा सामना; पावसामुळे नाणेफेक लांबणीवर

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा सामना; पावसामुळे नाणेफेक लांबणीवर

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना
  • हॅमिल्टन येथील सेडन पार्क मैदानावर सामना खेळवला जाणार
  • भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जाणार आहे. हॅमिल्टनमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा नाणेफेक (टॉस) लांबणीवर पडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी नाणेफेक सकाळी साडेसातला होणार होती. मात्र, पाऊस पडत असल्याने टॉस अद्याप झाला नाही. दरम्यान, भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा सामना कर्णधार शुभमन गिलसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यानंतर तो कसोटी मालिकेची तयारी सुरू करेल आणि श्रेयस अय्यर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल.

हॅमिल्टनमध्ये थंडी आणि पावसाचेही सावट असून, त्यामुळे सामना लवकर संपण्याची शक्यता आहे. पाऊस आणि आर्द्रतेमुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकते, जिथे अतिरिक्त स्विंग आणि असमान उसळीमुळे फलंदाजांची कसोटी लागेल.

रोहित शर्माला जुना फॉर्म परत मिळवावा लागेल

ईडन पार्कवरील विराट कोहलीच्या शानदार खेळीव्यतिरिक्त, भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला संघर्ष करावा लागला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी रोहित शर्मा दोघेही किवी गोलंदाजांविरुद्ध सहज खेळताना दिसले नाहीत. गेल्या दोन सामन्यांमध्ये ० आणि २३ धावा करणाऱ्या रोहित शर्माला आपला जुना फॉर्म परत मिळवावा लागेल.

FAQ

१. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना कधी होणार आहे?

१० नोव्हेंबर रोजी.

२. तिसरा सामना कुठे खेळवला जाणार आहे?

हॅमिल्टनमधील सेडन पार्क मैदानावर.

३. भारतीय संघाने मालिकेत किती आघाडी घेतली आहे?

भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: Third odi match between india and new zealand nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 07:59 AM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ 3rd Test

संबंधित बातम्या

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
1

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Cricket News: पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅशमध्ये कॉग्निझंटचा विजयाचा चौकार! यूबीएस पुणेचीही विजयी घोडदौड कायम
2

Cricket News: पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅशमध्ये कॉग्निझंटचा विजयाचा चौकार! यूबीएस पुणेचीही विजयी घोडदौड कायम

Cricket News: खेळायचं तर रांगड्या पद्धतीनं! ‘या’ लीगमध्ये लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय
3

Cricket News: खेळायचं तर रांगड्या पद्धतीनं! ‘या’ लीगमध्ये लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree
4

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.