Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: 25 बॉल्समध्ये 24 रन्स, तरीही सर रविंद्र जडेजाच्या नावे मोठा विक्रम; ‘असा’ रेकॉर्ड बनवणारा दुसरा भारतीय खेळाडू

राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी केवळ हार्दिक पांड्याच्या नावावर होता. असे करणारा रविंद्र जडेजा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 01:31 PM
रविंद्र जडेजाचा अनोखा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रविंद्र जडेजाचा अनोखा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रविंद्र जडेजाचा आयपीएलमध्ये विक्रम 
  • असा विक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू 
  • हार्दिक पांड्याला सोडले मागे 
IPL चा खेळ आता चांगलाच रंगू लागला आहे. मात्र राजस्थान रॉयल्स वगळता नक्की कोणते संघ पुढे येऊ शकतील याचा अंदाज अजून आलेला नाही. दर दुसरीकडे राजस्थान रॉयलच्या संघातून अनेक जणांचे वेगवेगळे विक्रम होत आहेत आणि त्यापैकी एक विक्रम सर रविंद्र जडेजानाही केला आहे. आरसीबीविरूद्ध झालेल्या सामान्यात रविंद्रने केवळ २४ धावा काढल्या असूनही त्याच्या नावे अनोखा विक्रम झाला आहे आणि असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. 

IPL 2026 च्या १६ व्या सामन्यात, बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून (RR) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ६ गडी राखून पराभव झाला. या सामन्यात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक विशेष टप्पा गाठला. नक्की काय आहे हा रेकॉर्ड जाणून घ्या 

T20 क्रिकेटमधील जडेजाचा मोठा विक्रम

या सामन्यात रवींद्र जडेजाने टी२० क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण केल्या. यासह, जडेजा टी२० क्रिकेटमध्ये ४,००० धावा आणि २०० बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. जडेजाच्या आधी केवळ हार्दिक पांड्याने हा पराक्रम केला आहे. हा पराक्रम करणारा जडेजा एकूण २५ वा खेळाडू आहे. जडेजाने आपल्या २ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १४ धावा देत उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि रोमारियो शेफर्डची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

वय अवघे 15, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द मॅच आणि Virat Kohli कडून खास गिफ्ट; 2 शब्दात किंगकडून वैभव सूर्यवंशीला कौतुकाची थाप

वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांची शानदार कामगिरी

आरसीबीने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल अवघ्या १३ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. १५ वर्षीय फलंदाज वैभवने ३०० च्या स्ट्राईक रेटने अवघ्या २६ चेंडूंमध्ये ७८ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत वैभवने ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार ठोकले. वैभवसमोर आरसीबीचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले. जुरेलनेही अर्धशतक झळकावले. मात्र, शिमरॉन हेटमायर शून्यावर बाद झाला आणि कर्णधार रियान पराग केवळ ३ धावाच करू शकला.

RCB च्या २०१ धावा

यापूर्वी, आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून २०१ धावा केल्या. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर, कर्णधार रजत पाटीदारने एका टोकाकडून शानदार फलंदाजी करत ४० चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि तो १६ चेंडूंमध्ये ३२ धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यरने १५ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा केल्या, तर रोमारियो शेफर्डने २२ धावांचे योगदान दिले.

RCB Vs RR Live: आधी पावसाने झोडपलं, मग Vaibhav Suryvanshi ने धोपटलं! राजस्थानकडून आरसीबी ‘चितपट’

Web Title: Ipl 2026 ravindra jadeja completed 4000 runs in t20 cricket and equaled record with hardik pandya in rcb vs rr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ravindra Jadeja
  • RR vs RCB

संबंधित बातम्या

वय अवघे 15, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द मॅच आणि Virat Kohli कडून खास गिफ्ट; 2 शब्दात किंगकडून वैभव सूर्यवंशीला कौतुकाची थाप
1

वय अवघे 15, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द मॅच आणि Virat Kohli कडून खास गिफ्ट; 2 शब्दात किंगकडून वैभव सूर्यवंशीला कौतुकाची थाप

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट
2

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट

RCB Vs RR Live: आधी पावसाने झोडपलं, मग Vaibhav Suryvanshi ने धोपटलं! राजस्थानकडून आरसीबी ‘चितपट’
3

RCB Vs RR Live: आधी पावसाने झोडपलं, मग Vaibhav Suryvanshi ने धोपटलं! राजस्थानकडून आरसीबी ‘चितपट’

RR Vs RCB: रजत पाटीदार आरसीबीसाठी ठरला ‘संकटमोचक’; आरआरला हॅट्रिकसाठी 202 रन्सची गरज
4

RR Vs RCB: रजत पाटीदार आरसीबीसाठी ठरला ‘संकटमोचक’; आरआरला हॅट्रिकसाठी 202 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.