IPL Playoffs: Mumbai, Bangalore to play fixed matches in playoffs! CSK-RR have a tough road ahead, while KKR-SRH have a tough road ahead
IPL Playoffs : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगमंत आतापर्यंत 51 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. गुरुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सकडून १०० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. हा पराभव आरआरचा ११ सामन्यांमधील तब्बल ८ वा पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करताना एमआयने २ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरआर १७व्या षटकात ११७ धावांवर गारद झाला. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या, जो दीपक चहरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. एमआयने सलग सहावा विजय नोंदवला. या पराभवासह, आरआर आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा चेन्नई सुपर किंग्जनंतरचा दुसरा संघ बनला आहे. याशिवाय, इतर संघ अजून देखील प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून आहेत.
हेही वाचा : कोहली-धोनीच्या शेवटच्या आयपीएल लढतीत पाऊस खलनायक ठरेल का? RCB vs CSK सामना वाया गेला तर…