फोटो सौजन्य – X
भारताचा t20 आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटला अलविदा केला होता, तर इंग्लंड दौऱ्याआधी भारताचे दोन्ही स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही कसोटी क्रिकेटला देखील अलविदा केला आहे. आता रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. भारताची पुढील मालिका ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे त्याआधी टीम इंडिया अशिया कप खेळणार आहे यंदा आशिया कप हा टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणार आहे.
रोहितने जिममध्ये सराव करताना सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली. आयपीएलनंतर रोहितने काही महिन्यांसाठी खेळापासून ब्रेक घेतला. दरम्यान, भारतीय पुरुष संघ इंग्लंडच्या कठीण दौऱ्यावर होता. इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.इंग्लंडमध्ये कुटुंबाच्या सुट्टीनंतर तो गेल्या आठवड्यात परतला. रोहितला प्रशिक्षण देणारा अभिषेक नायरने दिनेश कार्तिक, केएल राहुल, रिंकू सिंग आणि केकेआरचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी यांसारख्या खेळाडूंसोबतही काम केले आहे.
The comeback loading of Rohit Sharma.⏳🙌 pic.twitter.com/lGtSauKgdi
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 14, 2025
इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने केएल राहुलसोबत काम केले होते. दरम्यान, रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दलची चर्चाही तीव्र झाली आहे. अनेक माध्यमांमध्ये असे म्हटले आहे की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोहितकडे पाहत नाहीत. यामध्ये केवळ रोहितच नाही तर विराट कोहलीचेही नाव आहे. तथापि, सध्या बोर्डाचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर आहे आणि म्हणूनच रोहित आणि विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल फारशी घाई नाही.
दरम्यान, रोहित पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे आणि पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत एकदिवसीय विश्वचषकात भारताचे कर्णधारपद चुकवायचे नाही. महेंद्रसिंग धोनीनंतर, रोहित शर्मा हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहित शर्मा अभिषेक नायर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये तो मैदानावर सराव करताना दिसत आहे.
Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक आणि या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ट्रॉफी तसेच एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. रोहित हा टप्पाही गाठू शकतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक-२०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.