Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: महिला समान सन्मान; देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 50 लाडक्या पैलवान बहिणींमध्ये चुरशीची कुस्ती

मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' चा नारा देत 50 लाडक्या 'पैलवान' बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2025 | 02:31 PM
Jalgaon News: महिला समान सन्मान; देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 50 लाडक्या पैलवान बहिणींमध्ये चुरशीची कुस्ती

Jalgaon News: महिला समान सन्मान; देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 50 लाडक्या पैलवान बहिणींमध्ये चुरशीची कुस्ती

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव/ सिद्धेश प्रधान :- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या 16 फेब्रुवारीला ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-2 मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत 50 लाडक्या ‘पैलवान’ बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि समारोप महिला कुस्तीने केला जाणार आहे. कुस्तीच्या इतिहासात महिला कुस्तीपटूंना असा सन्मान प्रथमच दिला जात असल्याची स्फूर्तिदायक माहिती संयोजक समितीचे प्रमुख हिंदकेसरी रोहित पाटील यांनी दिली.

प्रथमच 9 देशांच्या मल्लांचा कुस्ती महामुकाबला!

या महामुकाबल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत.

भव्य स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी ही एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडणार आहे. तसेच विजय चौधरी (विश्व विजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया विजेता- उझबेकिस्तान), प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन), अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलीम्पियन – रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन – मोल्दोवा), पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब ( आशियाई पदकविजेता – इराण), हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. पै. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन – जॉर्जिया), सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब) , पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर (आंतरराष्ट्रीय विजेता – दिल्ली ), वेताळ शेळके (भवानी केसरी – महाराष्ट्र) वि. दिनेश गोलिया (आंतरराष्ट्रीय विजेता- हरियाणा), फ्लोरिन ट्रिपोन (युरोप चॅम्पियन – रोमानिया) वि. महेंद्र गायकवाड़ (उपमहाराष्ट्र केसरी), भूपिन्दर सिंह (भारत केसरी – पंजाब ) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा), कमलजित धूमछडी (रुस्तुम ए हिंद – पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता – हरियाणा), सतेंदर मलिक (भारत केसरी – हरियाणा ) वि. योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी), बालाराफिक शेख (महाराष्ट्र केसरी) वि. सोनू (हिमाचल केसरी- हरियाणा), हरियाणा माउली जमदाडे (महान भारत केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी-हरियाणा), शिवा चव्हाण (राष्ट्रीय विजेता – महाराष्ट्र) वि. रजत मंडोथी (त्रिमूर्ती केसरी – हरियाणा), मुन्ना झुंजुर्के (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. हरिओमी ट्रॅक्टर (राष्ट्रीय विजेता- दिल्ली), बाळू बोडके (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. मनजीत मेला (राष्ट्रीय विजेता- हरियाणा), वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती), अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती ) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती) या 22 प्रमुख लढतीसोबत स्थानिक 300महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार कुस्त्या पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरशा वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली. ही स्पर्धा रविवार,16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11वाजता सुरू होऊन संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जागत, या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Web Title: Jalgaon news women equal respect 50 lovely wrestler sisters wrestle fiercely at the devabhau kesari international tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Kusti
  • Sports

संबंधित बातम्या

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
1

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
2

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य
3

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
4

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.