फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक : पाकिस्तानच्या संघाचे ODI आणि T२० संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पाकिस्तानात भूकंप झाला. त्यानंतर यासंदर्भात सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षक बनल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच प्रशिक्षकपद सोडले म्हणजेच राजीनामा दिला आहे. कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. कर्स्टनने हे पद सोडल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी पुन्हा एकदा संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) टीका केली आहे. एक प्रकारे बासित यांनी पीसीबीचा पर्दाफाश केला आहे.
गॅरी कर्स्टन मोठ्या अपेक्षा घेऊन पाकिस्तानात आले. गॅरी कर्स्टन यांच्या कोचिंगमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कर्स्टनने पाकिस्तानसोबत असेच काही करून त्याला चॅम्पियन बनवणे अपेक्षित होते पण असे झाले नाही. दोन वर्षांचा करार त्यांनी सहा महिन्यात सोडला मध्येच सोडला.
आता सोशल मीडियावर एक पोस्ट पीसीबीने शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा सादर केल्यानंतर, जेसन गिलेस्पी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यावर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज जाहीर केले, जे स्वीकारण्यात आले”.
The Pakistan Cricket Board today announced Jason Gillespie will coach the Pakistan men’s cricket team on next month’s white-ball tour of Australia after Gary Kirsten submitted his resignation, which was accepted.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 28, 2024
कर्स्टन यांच्या राजीनाम्यानंतर बासित अली यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर हल्ला चढवला असून कर्स्टन यांनी चुकीच्या गोष्टी बोलल्यामुळे त्यांनी हे पद सोडल्याचे म्हटले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित म्हणाले, “कोच खूप ताकद घेऊन आले आहेत. प्रशिक्षक, निवडकर्ते, व्यवस्थापकांना हटवले जात आहे. पूर्वी अध्यक्ष वेळोवेळी बदलत असत. आता असे आहे की जो कोणी त्यांच्याविरोधात आवाज उठवला तर त्याला उठवले जात आहे, त्याला बाजूला केले जाईल असे त्यांनी सांगितले.”
ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाल्यानंतर लगेचच नक्वी यांनी पाकिस्तानच्या नवीन वनडे आणि टी-२० कर्णधाराच्या नावाचीही घोषणा केली होती. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बासित म्हणाले की, कर्स्टनला रिजवानने कर्णधार बनवायचे नव्हते. ही गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा मोहम्मद रिझवानला पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडूच्या संघांचा कर्णधार बनवण्यात आले. कर्स्टनला दुसऱ्या खेळाडूला कर्णधार बनवायचे होते आणि ते नवीन खेळाडूची मागणी करत होते. दुर्दैवाने दोघेही संघात नव्हते. ते विचार करत होते की त्यांनी त्यांना पूर्ण अधिकार मिळाला आहे, पण त्यांना माहित नाही की पाकिस्तानमध्ये पीसीबी चेअरमन एका रात्रीत बदलले जाऊ शकतात.