IND vs WI 1st Test: Jasprit Bumrah stuns in Test cricket! He breaks Kapil Dev's 'this' record
Jasprit Bumrah creates history against West Indies : अहमदाबाद येथे बबहरत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १६२ धावाच करू शकला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केल आहे. त्याने त्याच्या स्पेल डावात ३ फलंदाजांना माघारी पाठवले. दोन फलंदाजांना बोल्ड केले. त्याच्या या कामगिरीने बुमराहने एक अनोखा विक्रम रचला आहे.
बुमराह २०२५ मध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज बनला आहे. या वर्षी बुमराहने कसोटीत १२ फलंदाजांना बोल्ड केले आहे. या यादीमध्ये मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर आहे. सिराजने २०२५ मध्ये नऊ फलंदाजांना बोल्ड केले आहे. यासोबतच जसप्रीत बुमराहने २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १५ बळी घेतले आहेत. जे या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही पूर्ण सदस्य गोलंदाजाकडून घेतलेले सर्वाधिक बळी आहेत.
हेही वाचा : IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज
२०२५ मध्ये सर्वाधिक बोल्ड आऊट करणारे गोलंदाज
यासोबतच जसप्रीत बुमराहने भारतात खेळताना ५० बळी देखील टिपले आहेत. बुमराहने भारतातील त्याच्या १३ व्या कसोटी सामन्यात ५० बळींचा टप्पा पार केला आहे.जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारताबाहेर ३६ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये एकूण १७२ बळी टिपले आहेत. जसप्रीत बुमराहने १७ च्या सरासरीने ५० कसोटी बळी पूर्ण केला आहेत. आशियामध्ये ५० किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या सर्व गोलंदाजांमध्ये ही सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी राहिली आहे. भारतीय भूमीवर ५०+ कसोटी बळी घेणारा जसप्रीत बुमराह २७ वा भारतीय गोलंदाज बनला आहे.
जसप्रीत बुमराहने भारतात ५० बळी घेऊन भारताचा दिग्गज माझी खेळाडू कपिल देवचा विशेष विक्रम मोडीत काढला आहे. भारतात ५० कसोटी बळी टिपणारा बुमराहने सर्वात जलद गोलंदाज म्हणून कपिल देवला मागे टाकले आहे. कपिल देवने २५ डावात त्याच्या कारकिर्दीत ५० कसोटी बळी टिपले आहेत. आता, जसप्रीत बुमराहने फक्त २४ डावात भारतात ५० बळी घेतले आहेत.
हेही वाचा : IND vs WI: कुलदीप यादवचा किलर बॉल आणि शाई होप त्रिफळाचित! Video होतोय तूफान व्हायरल
WTC स्पर्धेत घरच्या मैदानावर ५० विकेट्स गाठणारा पहिला भारतीय
याव्यतिरिक्त, जसप्रीत बुमराह हा WTC स्पर्धेत घरच्या मैदानावर ५० विकेट्स टिपणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारतासाठी रविचंद्रन अश्विन (१४९ विकेट्स) आणि रवींद्र जडेजा (९४ विकेट्स) यांनी ही किमया साधली आहे. परंतु दोन्ही गोलंदाज फिरकी गोलंदाज आहेत.
सामन्याबद्दल सांगायचे तर, वेस्ट इंडिज पहिल्या डावात १६२ धावांवर ऑलआउट झाले होते. भारताकडून सिराजने चार विकेट्स घेतल्या, तर बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.