'बीसीसीआय'चे खेळाडूंना मोठे गिफ्ट; बंगळुरूत NCA चे लोकार्पण, ३ मैदाने, ८६ खेळपट्ट्या आणि मिळणार...
बंगळुरू: क्रिकेट हा खेळ जगभर प्रसिद्ध असणारा खेळ आहे. दरम्यान भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटसाठी एक चांगली गोष्ट आज घडली आहे. कारण बीसीसीआयने बंगळुरू येथे आपल्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे. आजपासून ही अकदामी खेळाडूंसाठी सुरू झाली आहे. दरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूना एक प्रकारचे गिफ्ट दिल्याचे म्हटले जात आहे. तसेच बीसीसीआयने एनसीएचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्या हस्ते या अकादमीचे लोकार्पण करण्यात आले.
एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) आता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेन्स या नावाने ओळखले जाणार आहे. या नवीन केंद्रात अनेक सुसज्ज आणि हायफाय सुविधा देण्यात आल्या आहेत. ४० एकर परिसरात पसरलेल्या या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेन्स (BCE) मध्ये खेळाला पुढे नेण्यासाठी ३ मैदाने आणि ८६ खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर खेळांचा समावेश असणार आहे. भारतीय खेळाडूंसाठी व खेळांसाठी हा एक चांगला मंच तयार करण्यात आला आहे.
या नवीन लोकार्पण करण्यात आलेल्या अकादमीत १६,००० हजार चौरस फुटांच्या आकाराचे जीम तयार करण्यात आले आहे. ओपन थिएटर आणि २४० पेक्षा जास्त खोल्या बांधण्यात आल्या आहेत. ४५ आउटडोअर पिच आहेत. ८० सीटर कोचिंग रूम, स्विमिंग पूल आणि अशा अनेक सोयी-सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत.
I am delighted to announce the launch of the Centre of Excellence by @BCCI. The state-of-the-art facility features three world-class playing grounds, a swimming pool, a pavilion, and advanced training, recovery, and medical amenities. This initiative will help current and future… pic.twitter.com/Piudtr1AQN — Jay Shah (@JayShah) September 29, 2024
ऑलिम्पिक खेळांच्या आकाराचा जलतरण तलाव
नवीन एनसीएमध्ये ३ जागतिक दर्जाची क्रिकेट मैदाने, सरावासाठी ४५ खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. याशिवाय ऑलिम्पिक खेळांच्या आकाराचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे, तर पुनर्प्राप्ती आणि क्रीडा विज्ञानाशी संबंधित अनेक सुविधा येथे उपलब्ध असतील. ही नवीन अकादमी आमच्या नवोदित आणि आगामी क्रिकेटपटूंना सर्वोत्तम वातावरणात प्रशिक्षणाचा अनुभव देईल. या मोहिमेला सर्वांचा पाठिंबा अतुलनीय आहे, असे ई-मेलमध्ये पुढे लिहिले आहे. या नवीन अकादमीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढेल अशी आशा जय शहा यांनी व्यक्त केली.