Asia Cup 2025 Final: Team India players are rich! BCCI showers Rs 204 crore in prizes; Read in detail
IND vs PAK Final : भारतीय संघाने आशिया कप २०२५(Asia Cup 2025) स्पर्धेत शानदार कांगिरीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने विजेतेपद जिंकले आहे. या सामन्यात ४ विकेट्स घेणारा कुलदीप यादव, ६९ धावा करणारा तिलक वर्मा या विजयाचे हीरो ठरले आहेत. भारतीय संघाने गेल्या काही काळात शानदार कामगिरी केली आहे. सलग तीन बहु-संघीय स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघाने कक्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडियाने गेल्या १५ महिन्यांत तीन प्रमुख स्पर्धा आपल्या नावावर केल्या आहेत. २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२५ आशिया कपचे जेतेपद मिळवले आहे. टीम इंडियाने हे सर्व स्पर्धा एकतर्फी विजयाने जिंकले आहेत आणि बीसीसीआयने खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : IND vs PAK Final : कोच गौतम गंभीरची इतिहासाला गवसणी! ‘ही’ कामगिरी करणारा तो जगातील ठरला पहिलाच खेळाडू…
आशिया कप २०२५ चे विजेतेपद भारतीय संघासाठी विशेष आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून धुव्वा उडवला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. सर्वांच्या नजरा आशिया कपवर खिळून होत्या. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ३ वेळ पराभव केला आहे. बीसीसीआयने या उल्लेखनीय विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून संघासाठी २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी, ९ मार्च २०२५ रोजी टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. हा भारतीय संघाचा तिसरा विजय होता. या विजयानंतर, बोर्डाकडून २० मार्च रोजी खेळाडू आणि प्रशिक्षकांसह संघातील सर्व सदस्यांसाठी ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघाने सर्वच सामने जिंकले होते आणि परिणामी भारताने विजेतेपद आपल्या नावावर केले.
हेही वाचा : IND vs PAK Final : पाकिस्तानला दाखवला खरा चेहरा! भारताचा केला जयजयकार; ‘ती’ परदेशी मुलगी कोण? पहा VIDEO
आशिया कप २०२५ पूर्वी, भारतीय संघाने जून २०२४ मध्ये टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. विजेतेपदाच्या सामन्यात, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना त्यांना ७ धावांनी पराभूत धूळ चारली होती १७ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ट्रॉफी आपल्याकडे परत मिळवली. त्यानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती. याचा सरल अर्थ असा की, या तीन स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय संघावर आतापर्यंत एकूण २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे.