Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोर निराशा! व्हिसा न मिळाल्याने अमेरिकेतील स्पर्धेस खेळाडू मुकले, पदकेही हुकली; जीवनज्योत सिंग तेजा यांनी व्यक्त केली खंत

देशाच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाला व्हिसाच्या विलंबामुळे अमेरिकेतील हंगामातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेत खेळता आले नाही, ज्यामुळे संघाला पदकांपासून दूर राहावे लागल्याचे मत जीवनज्योत सिंग तेजा यांनी व्यक्त केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 11, 2025 | 07:41 AM
Huge disappointment! Players missed out on US competition, medals too due to visa unavailability; Jeevanjyot Singh Teja expresses regret

Huge disappointment! Players missed out on US competition, medals too due to visa unavailability; Jeevanjyot Singh Teja expresses regret

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता : देशाच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाला व्हिसाच्या विलंबामुळे अमेरिकेत झालेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक स्टेज १ स्पर्धेत खेळता आले नाही, ज्यामुळे संघाला पदकांपासून वंचित राहावे लागले असे मत भारतीय प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी वर्तविले. २०२४ मध्ये जगातील अव्वल क्रमांकाच्या भारतीय महिला कंपाउंड संघाने तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. त्यांच्या तीन सदस्यांना-विश्वविजेती अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर आणि तनिपार्थी चिकिथा यांना वेळेवर अमेरिकेचे व्हिसा मिळाले नाहीत. ज्यामुळे ते फ्लोरिडातील ऑर्बरन्डेल येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेऊ शकले नाहीत. तसेच तेजा स्वतः अमेरिकेला जाऊ शकले नाही. आमच्या महिला संघाला ही स्पर्धा जिंकण्याची १०० टक्के संधी होती.

हेही वाचा : GT vs RR : ‘आमच्या गोलंदाजांनी कठीण परिस्थितीतही..’; राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेलचे मत..

गेल्या वर्षी शांघाय, येचियोन आणि अंताल्या येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आम्ही तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. परंतु, दुर्दैवाने व्हिसाच्या विलंबामुळे आम्हाला यावेळी आमचे जेतेपद राखून् ठेवण्यास शक्य झाले नाही. हरविंदर सिंगला २०२१ मध्ये टोकियो येथे भारताचे पहिले पॅरालिम्पिक तिरंदाजी पदक (कांस्य) जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने ऐतिहासिक सुवर्णपदक सुवण जिंकले तेव्हाही तो तिथे उपस्थित होता. भारतीय तिरंदाजी संघटनेने (एएआय) तीन महिन्यांपूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. आमच्याकडून  तीन महिन्यांपूर्वी निवड चाचण्या घेण्यात आल्या आणि संघाची घोषणा झाल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला करण्यात आला. आम्हाला ‘अनुशेष’ बद्दल माहिती होती. अमेरिकन दूतावास आणि नंतर क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांनंतर देखील, व्हिसा ८ एप्रिल रोजीच जारी करण्यात आला, तोपर्यंत कंपाऊंड स्पर्धा सुरू देखील झाली होती.

हेही वाचा : DC Vs RCB: केएल राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीचा दबंग विजय; आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव

स्पर्धा सुरू झाल्यावर मिळाला व्हिसा

परंतु व्हिसाला वारंवार विलंब झाल्यानंतर, केवळ १४ सदस्यांना व्हिसा मंजूर करण्यात आला. याबबात  एएआयने इंस्टाग्रामवर एक आवाहन देखील प्रसिद्ध केले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेप केल्यामुळे व्हिसा मिळाला. तथापि, नऊ पैकी दोघांना व्हिसा नाकारण्यात आला होता. तर तीन महिला कंपाउंड धनुर्धार्यासह इतर सात जणांना स्पर्धा सुरू झाल्याच्या दिवशी म्हणजे आठ एप्रिल रोजी व्हिसा मंजूर करण्यात आला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर तीन कंपाउंड धनुर्धारी पाठवण्यात काही एक अर्थ उरला नव्हता. आम्हाला त्यांची तिकिटे रद्द करावी असे एएआयच्या सहाय्यक सचिव गुंजन अब्रोल यांच्याकडून सांगण्यात आले.

Huge disappointment! Players missed out on US competition, medals too due to visa unavailability; Jeevanjyot Singh Teja expresses regret

Web Title: Jeevanjyot singh teja regrets not getting visa for us tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 07:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.