फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सचा हा स्पर्धेतील चौथा विजय आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा दुसरा पराभव आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर ६ विकेट्सने केला पराभव. या सामन्यात बंगळुरूच्या संघाने पहिले फलंदाजी करत ७ विकेट्स गमावून १६३ धावा केल्या होत्या. आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांनी मोठी खेळी खेळण्यापासून रोखले आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही.
दिल्ली कॅपिटसच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर दिल्लीचे सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसी आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे दोन्ही फलंदाज मोठी कामगिरी करण्यात फेल ठरले. अभिषेक पोरेलने सात चेंडूंमध्ये ७ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल १५ धावा करून बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलने संघासाठी दमदार खेळी खेळली यामध्ये त्याने ५३ चेंडूंमध्ये ९३ धावांची नाबाद खेळी खेळली, यामध्ये त्याने ६ षटकार आणि ७ चौकार ठोकले. ट्रिस्टन स्टब्सने संघासाठी २३ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या.
Match 24. Delhi Capitals Won by 6 Wicket(s) https://t.co/h5Vb7sp2Z6 #RCBvDC #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
बंगळुरूच्या संघासाठी फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. फिल्म सॉल्ट संघासाठी १७ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या, यामध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार मारले तर विराट कोहली याने १४ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या त्यांनी यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारला. मागील सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा देवदत्त पडीकल याने या सामन्यात विशेष कामगिरी केली नाही तो या सामन्यात आठ चेंडू खेळला आणि एक धाव करून बाद झाला. रजत पाटील यांनी मागील सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे पण या सामन्यात तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.
𝐌𝐨𝐦𝐞𝐧𝐭𝐮𝐦 = 𝐏𝐨𝐰𝐞𝐫𝐞𝐝 𝐛𝐲 𝐊𝐋 & 𝐒𝐭𝐮𝐛𝐛𝐬 👊
🎥 KL Rahul and Tristan Stubbs launch an attack to ignite #DC‘s chase 💪
They need 30 off 24.
Updates ▶ https://t.co/h5Vb7sp2Z6#TATAIPL | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/LICgoUF3xy
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
रजत पाटीदार याने २३ चेंडू खेळले आणि त्याने २५ धावा करून कुलदीप यादवने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. लियाम लिविंगस्टोन या सामन्यातही फेल ठरला. त्याने ६ चेंडू खेळले आणि मोहित शर्माने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जितेश शर्माने मागील सामन्यांमध्ये महत्त्वाची खेळी खेळली होती. या सामन्यात तो ११ चेंडू खेळला आणि फक्त ३ धावा केल्या. कृणाल पांड्याने १८ चेंडू मध्ये १८ धावांची खेळी खेळली तर टीम डेव्हिडने विश चैनल मध्ये ३७ धावा केल्या. यामध्ये त्याने चार षटकार आणि दोन चौकार मारले.
अब आयेगा मजा! KKR च्या ताफ्यात दाखल झाला ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू; अमिताभ बच्चन यांच्याशी आहे खास नाते
गोलंदाजाच्या कामगिरीवर नजर टाकली तर विप्राज निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले तर मुकेश शर्मा आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बद्दल सांगायचे झाले तर भुवनेश्वर कुमारने संघासाठी २ विकेट घेतले यश दयालने संघासाठी १ विकेट घेतला आणि सुयश शर्माने संघासाठी १ विकेटची कमाई केली.