पार्थिव पटेल(फोटो-सोशल मीडिया)
GT vs RR : आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या प्रभावी कामगिरीबद्दल संघाच्या गोलंदाजांचे गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी कौतुक केले. तसेच ते म्हणाले की, त्यांनी फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या. साई सुदर्शनने शानदार अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर सर्व गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत गुजरात टायटन्सला ५८ धावांनी विजय मिळवून दिला.
गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने २४ धावांत ३ बळी घेतले. तर रशीद खान आणि साई किशोरने प्रत्येकी दोन बळी घेत राजस्थानला १५९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा तुम्ही अशा विकेटवर ५० पेक्षा जास्त धावांनी जिंकता तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या गोलंदाजांनी रणनीती चांगली राबवली. मोहम्मद सिराजने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत आहे.
हेही वाचा : GT vs RR : गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवानंतर संजू सॅमसनला ही चूक पडली महागात! कर्णधाराला ठोठावला दंड
साई किशोर हा कदाचित आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. आमच्या सर्व गोलंदाजांनी कठीण गोलंदाजीच्या परिस्थितीतही उत्तम कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात एक गोलंदाज पुढे येत आहे आणि नेतृत्व करत आहे हे पाहून आनंद होतो. अर्थातच फलंदाजांनी विजयाचा पाया रचला पण प्रत्यक्षात गोलंदाजच तुम्हाला सामना जिंकून देतात. आमच्या संघात कोणालाही कोणतीही विशिष्ट भूमिका देण्यात आलेली नाही. एक संघ म्हणून आमचा दृष्टिकोन खूप सोपा आहे. आम्ही परिस्थितीनुसार आमची रणनीती तयार करतो.
लक्ष्य साध्य करणे शक्य होते. परंतु त्यांचा संघ चांगली भागीदारी करण्यात अपयशी ठरला असे मत राजस्थान रॉयल्सचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले म्हणाले. मला वाटतं लक्ष्य साध्य करता आलं असतं. फलंदाजीसाठी ती खूप चांगली विकेट होती. खरे सांगायचे तर, २०० धावा आता सामान्य आहे. आम्ही वीस धावा जास्त दिल्या पण त्यांनी चांगली फलंदाजी केली. सुदर्शनने उत्तम फलंदाजी केली आणि त्याने पॉवर प्लेचाही चांगला वापर केला. त्यांच्या फलंदाजांनी आमच्यापेक्षा चांगल्या भागीदारी केल्या. म्हणूनच त्यांनी मोठी धावसंख्या उभारली पण जर आम्ही लक्ष्याच्या खूप जवळ पोहोचू शकलो असतो असे मला वाटते.
हेही वाचा : DC Vs RCB: केएल राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीचा दबंग विजय; आरसीबीचा 6 विकेट्सनी पराभव
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत २१६ धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ८२ धावा केल्या. यानंतर, २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ १९.२ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचबरोबर शाहरुख खानने संघासाठी ३६ धावांची महत्वाची खेळी खेळली. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ फक्त १५९ धावा करू शकला आणि संघाचे सर्व फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. राजस्थानच्या संघासाठी शिमरॉन हेटमायर याने संघासाठी चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. हेटमायरने ३२ चेंडूंमध्ये ५२ डावांची खेळी खेळली, तर कॅप्टन संजू सॅमसन ४१ धावा केल्या. तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट नावावर केले.