फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
इंग्लडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची मालिका होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे आणि या सामन्यात इंग्लंड न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभूत केलं आहे त्यामुळे मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाकडे आघाडी आहे. इंग्लंडचा स्टार टेस्ट बॅट्समन जो रूट सध्या धावा आणि शतके झळकावत आहे. वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावले. वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात जो रूटने १०६ धावा केल्या आहेत. जो रूटने आतापर्यंत १५१ कसोटी सामन्यांच्या २७६ डावांमध्ये ५०.९३ च्या उत्कृष्ट सरासरीने १२,८८६ धावा केल्या आहेत. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३६ शतके आणि ६४ अर्धशतके केली आहेत.
Virat Kohli Video : विराट कोहली हटके अंदाजात! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची केली स्लेजिंग
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. जो रूटने राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमधील महान विक्रमाची बरोबरी केली आहे. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपली ३६ शतके पूर्ण केली आहेत. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. राहुल द्रविडने भारतासाठी १६४ कसोटी सामन्यांच्या २८६ डावांमध्ये ५२.३१ च्या उत्कृष्ट सरासरीने १३,२८८ धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये ३६ शतके आणि ६३ अर्धशतके केली आहेत.
सचिन तेंडुलकर (भारत) – २०० कसोटी सामन्यांमध्ये ५१ शतके
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १६६ कसोटी सामन्यांमध्ये ४५ शतके
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १६८ कसोटी सामन्यात ४१ शतके
कुमार संगकारा (श्रीलंका) – १३४ कसोटी सामन्यांमध्ये ३८ शतके
जो रूट (इंग्लंड) – १५१ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतके
राहुल द्रविड (भारत) – १६४ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतके
Joe Root… That is RIDICULOUS! 🤯
He reaches three figures in style, ramping his way to a THIRTY-SIXTH Test century! pic.twitter.com/EFNXzRlatp
— England Cricket (@englandcricket) December 7, 2024
सचिन तेंडुलकर (भारत) – १५,९२१ धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १३,३७८ धावा
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १३,२८९ धावा
राहुल द्रविड (भारत) – १३,२८८ धावा
जो रूट (इंग्लंड) – १२,८८६ धावा
ॲलिस्टर कुक (इंग्लंड) – १२,४७२ धावा
जो रूट अजूनही केवळ 33 वर्षांचा आहे आणि तो सचिन तेंडुलकरचा १५,९२१ कसोटी धावांचा विश्वविक्रम मोडण्यापासून केवळ ३०३६ धावा दूर आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणे जो रूटसाठी फारसे अवघड जाणार नाही. जो रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्ध नागपुरात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मग हा फलंदाज सचिन तेंडुलकरचा कसोटी शतकांचा विक्रम मोडण्याचा दावेदार होईल, याची कल्पनाही कोणी केली नसेल.