फोटो सौजन्य - Cricbuzz सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उद्या म्हणजेच बुधवार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोन संघ चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना खेळणार आहेत. या स्पर्धेच्या आधी अनेक खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर झाले आहेत, त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक नव्या खेळाडूंसोबत मैदानात दिसेल. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळता येणार नाही.
Champions Trophy 2025 च्या अगदी आधी, न्यूझीलंडला आणखी एक धक्का, लॉकी फर्ग्युसन स्पर्धेतून बाहेर
आता न्यूझीलंड संघाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे, परंतु या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी काइल जेमीसन संघाचा भाग असेल. याआधीही न्यूझीलंड संघ दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहे. एक बदल आधीच केला गेला आहे.
🚨BREAKING🚨: Lockie Ferguson has been ruled out of CT 2025 due to an injury to his right foot, with Kyle Jamieson named as his replacement#CT2025 pic.twitter.com/aYpeO5sIl3
— CricTracker (@Cricketracker) February 18, 2025
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की रविवारी कराची येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या अनधिकृत सराव सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर फर्ग्युसनला उजव्या पायात वेदना जाणवल्या आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की तो संपूर्ण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त राहणार नाही. अशा परिस्थितीत, पायाच्या दुखापतीमुळे लॉकी फर्ग्युसन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात जवळ येत असताना आणि स्पर्धेचे स्वरूप कमी असल्याने, पुनर्वसन सुरू करण्यासाठी फर्ग्युसनला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
फर्ग्युसनची जागा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन घेईल आणि आज संध्याकाळी तो पाकिस्तानला रवाना होईल. अशा परिस्थितीत, तो १९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही. डिसेंबरमध्ये सुपर स्मॅशमध्ये जेमीसनने कॅन्टरबरी किंग्जसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पाठीच्या दुखापतीमुळे झालेल्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी तो १० महिने क्रिकेटपासून दूर होता. अलिकडेच, न्यूझीलंड आणि पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेदरम्यान, बेन सीयर्सलाही दुखापत झाली होती आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात जेकब डफीचा समावेश करण्यात आला. याशिवाय, एकदिवसीय तिरंगी मालिकेत दुखापत झालेली रचिन रवींद्र देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
मिचेल सँटनर (कर्णधार), केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, विल यंग, जेकब डफी आणि काइल जेमिसन