फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामान्यांची कसोटी मालिका सध्या सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाने मालिकेचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. भारताच्या संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या संघाचा शेवटचा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आले आहे. मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी मुंबईत एका तारखेपासून सुरू होण्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसन तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही असे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड, मालिकेत बरोबरी, कोणाच्या हाती लागणार सिरीज?
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे पहिला आणि दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी उजव्या हाताचा फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन तिसऱ्या सामन्यात खेळेल अशी आशा व्यक्त केली होती, मात्र ही आशा धुळीस मिळाली आहे विल्यमसनला मांडीचा त्रास आहे. केन विल्यमसनला मुंबई कसोटीत न खेळवण्याचा निर्णय खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे, जेणेकरून तो इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत पूर्णपणे तंदुरुस्त राहावा. तो पुन्हा अडचणीत येऊ नये म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत काळजी घेत आहे. संघाचे प्रशिक्षक स्टेड म्हणाले की, विल्यमसनने चांगली प्रगती केली आहे, मात्र इंग्लंड मालिकेबाबत तो कोणत्याही अडचणीत येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
Squad News | Kane Williamson will not travel to India for the third Test in Mumbai to ensure he his fit for the upcoming three-Test series against England 🏏 #CricketNationhttps://t.co/HpqP4w6Ufp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 29, 2024
सुरु असलेल्या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेऊन न्यूझीलंडने मालिका जिंकली आहे आणि त्यामुळे विल्यमसनला खेळवण्यावर फारसा जोर नसेल. स्टीड म्हणाले, “केनची तब्येत चांगली झाली आहे, परंतु तो आमच्यात सामील होण्यास तयार नाही. परिस्थिती चांगली असली तरी, आम्हाला वाटते की न्यूझीलंडमध्येच राहणे आणि त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम भागावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे.” तो इंग्लंडसाठी तयार होऊ शकतो.”
हेदेखील वाचा – बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंचा क्रिकेटला रामराम!
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला अजून एक महिना बाकी आहे. अशा परिस्थितीत विल्यमसनला पूर्णपणे तंदुरुस्त आणि लयीत होण्यासाठी वेळ मिळेल. स्टीड म्हणाला, “इंग्लंड मालिका अजून एक महिना बाकी आहे, त्यामुळे जर त्याने शहाणपणाने विचार केला तर तो इंग्लंडविरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार होईल.