फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय महिला संघाची सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यत दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. भारताच्या संघाने विश्वचषकात पहिल्या सामान्यत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे भारताची कर्णधार हरमनप्रीत संघाबाहेर होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने भारतीय क्रिकेट संघामध्ये पुनरागमन केले. आजचा मालिकेचा शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो संघ मालिका नावावर करेल.
पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत २२७ धावा केल्या यामध्ये तेजल हसबनीस आणि दीप्ती शर्मा यांनी संघासाठी कमालीची कामगिरी करून दाखवली. तेजल हसबनीसने संघासाठी पहिल्या सामन्यात ४२ धावा केल्या तर दीप्ती शर्माने संघासाठी ४१ धावा केल्या. शेफाली वर्माने २२ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. त्यानंतर यास्तिका भाटियाने संघासाठी ३७ धावांची खेळी खेळली. जेमिमाह रॉड्रिक्सने संघासाठी महत्वाची ३५ धावांची खेळी खेळली.
भारतीय महिला गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अविश्वनीय कामगिरी करून दाखवली. यामध्ये फिरकी गोलंदाज राधा यादवने संघासाठी ३ विकेट्स नावावर केले. साईमा ठोकरने संघासाठी दोन विकेट्स नावावर केले. तर दीप्ती शर्मा आणि अरुंधरी रेड्डी या दोघीनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. गोलंदाजांच्या कमालीच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ १६८ धावांवर बाद झाला आणि भारताच्या संघाला मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात २६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ५ धावांवर संघाने पहिला विकेट गमावला. स्मृती मानधना खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. जेस कारने शेफाली वर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ली ताहुहूने आपल्या तिसऱ्या षटकात यास्तिकाला बाद केले. जेमिमाह रॉड्रिग्जला २८ चेंडूत केवळ १७ धावा करता आल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूत २४ धावा केल्या. तेजल आणि दीप्तीने १५-१५धावा केल्या. अरुंधती रेड्डी दोन धावा करून बाद झाल्या तर सायमा २९ धावा करून बाद झाल्या. राधा यादव ६४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाली आणि संघाने सामना गमावला.
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.