Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kavya Maran : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात; ग्रीसमधील ड्रीमी वेडिंगचे फोटो व्हायरल

Kavya Maran : सनरायझर्स हैदराबादची सहमालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांचा ग्रीसमध्ये खासगी विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे पहिले फोटो समोर आले असून, २१ नोव्हेंबरला चेन्नईत भव्य रिसेप्शन होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 10:14 PM
Kavya Maran : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात; ग्रीसमधील ड्रीमी वेडिंगचे फोटो व्हायरल

Kavya Maran : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात; ग्रीसमधील ड्रीमी वेडिंगचे फोटो व्हायरल

Follow Us
Follow Us:
  •  लग्नाला जवळचे सदस्य उपस्थित
  • 21 नोव्हेंबरला चेन्नईत रिसेप्शन
  • 2024 पासून चर्चेत होते नाते
 

सनरायझर्स हैदराबाद संघाची सहमालकीण काव्या मारन  (Kavya Maran) आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले आहेत. बुधवारी (11 नोव्हेंबर) ग्रीसमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा खासगी विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर या नवदाम्पत्याने लग्नाचे पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले असून, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अनिरुद्ध आणि काव्या यांनी विवाहसोहळ्यासाठी आयव्हरी रंगाचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या ठिकाणी एकमेकांचा हात हातात घेऊन हसतमुखाने उभ्या असलेल्या या जोडीचे छायाचित्र चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अनिरुद्धने इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर करत, ‘माझ्या आयुष्यातील एक खास क्षण, जो कायमचा लक्षात राहील… 11.11’, असे लिहिले आहे.

लग्नाला जवळचे सदस्य उपस्थित

या विवाहसोहळ्याच्या कार्यक्रमांना 10 नोव्हेंबरपासून पारंपरिक साखरपुड्याने सुरुवात झाली होती. यावेळी दोन्ही कुटुंबांतील जवळचे सदस्य आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. अनिरुद्धचे काका आणि सुपरस्टार रजनीकांत, ऐश्वर्या रजनीकांत, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह अनेक मान्यवर ग्रीसमध्ये उपस्थित असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सन पिक्चर्सनेही एक्सवर या नवदाम्पत्याचे छायाचित्र शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन

21 नोव्हेंबरला चेन्नईत रिसेप्शन

ग्रीसमध्ये विवाहसोहळा पार पडल्यानंतर अनिरुद्ध आणि काव्या २१ नोव्हेंबरला चेन्नई येथे भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने शेअर केलेल्या पोस्टमधून रिसेप्शनची तारीख समोर आली आहे.

काव्या यांचे वडील कलानिधी मारन आणि आई कावेरी मारन यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. या रिसेप्शनला चित्रपट, राजकारण, उद्योग आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Maharani 5: ‘महाराणी’ पुन्हा येतेय! राणी भारती घेणार वैयक्तिक हिशेबांचा बदला; २०२७ मध्ये नवा सीझन

2024 पासून चर्चेत होते नाते

अनिरुद्ध आणि काव्या यांनी त्यांचे नाते आतापर्यंत खासगी ठेवले होते. 2024 मध्ये दोघे परदेशात एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, दोघांनीही त्यावेळी या चर्चांवर अधिकृत भाष्य केले नव्हते. अखेर ग्रीसमधील खासगी विवाहसोहळ्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अनिरुद्ध रविचंदर यांना ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे देशभरात लोकप्रियता मिळाली. ‘जेलर’, ‘विक्रम’, ‘लिओ’ आणि ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांतील संगीतामुळे त्यांनी संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या असून, त्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सहमालकीण आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांचा विवाह कधी झाला?

    Ans: दोघांचा विवाह बुधवारी, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी झाला.

  • Que: काव्या मारन आणि अनिरुद्ध यांचा विवाह कुठे झाला?

    Ans: ग्रीसमध्ये खासगी डेस्टिनेशन वेडिंग सोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला.

  • Que: काव्या मारन कोण आहेत?

    Ans: काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सहमालकीण आहेत.

Web Title: Kavya maran anirudh ravichander greece wedding photos rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • Anirudh Ravichander
  • Kavya Maran
  • Love Marriage

संबंधित बातम्या

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…
1

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.