
Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने...
इचलकरंजी येथील मंदार अजित रानडे (वय ३५) हे पुरोहिताचे (भटजी) काम करत होते. दरम्यान, संशयित बाबुसाहेब उर्फ दीपक अण्णा मगदूम (रा. शिरडवाड) याच्या नात्यातील एका मुलीने १३ जानेवारी २०२६ रोजी घरतून निघून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. हा विवाह मंदार रानडे यांनी जुळवून दिला होता, ज्याचा तीव्र राग बाबुसाहेबच्या मनात होता. याच रोषातून त्याने मंदार यांचा काटा काढण्याचा घाट घातला.
३१ ऑक्टोबर रोजी बाबुसाहेबने दुसऱ्या नंबरवरून मंदार यांच्याशी संपर्क साधून आणखी एका विवाहाचे स्थळ जुळवायचे असल्याचे सांगितले आणि त्यांना इचलकरंजीहून माणकापूर (ता. निपाणी) बाहेरील परिसरात बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे मंदार तिथे पोहोचताच, संशयित बाबुसाहेबने त्यांच्या डोळ्यात अचानक मिरचीपूड फेकून दिली. त्यामुळे मंदार यांना कोणताही प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. याच संधीचा फायदा घेत संशयिताने कोयत्याने त्यांच्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मंदार रानडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी इचलकरंजी येथील केदार चंद्रकांत कुलकर्णी यांनी सदलगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन व पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. चिक्कोडीचे मंडळ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली व पोलीस पथकाने तातडीने तपास करत संशयित बाबुसाहेब मगदूम याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विवाहाला मदत केल्याच्या रागारागात खून केल्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेला कोयताही पोलिसांनी जप्त केला आहे.
Ans: मंदार अजित रानडे (वय ३५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे मृत भटजीचे नाव आहे.
Ans: संशयिताच्या नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह मृत मंदार रानडे यांनी जुळवून दिल्याच्या रोषातून हा खून करण्यात आला.
Ans: सदलगा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने चालवत बाबुसाहेब उर्फ दीपक अण्णा मगदूम (रा. शिरडवाड) या संशयिताला अटक केली आहे.