फोटो सौजन्य - KolkataKnightRiders
कोलकाता नाइट राइडर्स विरूध्द राजस्थान रॅायल्स यांच्यामध्ये सुरु आहे. या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स यांनी नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने मागील सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात पहिले फलंदाजी करत कोलकताच्या संघाने राजस्थान विरूध्द 206 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. राजस्थान संघाला मागील सामन्यात मुबंई इंडीयन्स विरूध्द 100 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात राजस्थान रॅायल्सच्या फलंदाजानी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थान रॅायल्सच्या फलंदाजांवर चाहत्यांची नजर असणार आहे.
कोलकाता नाइट राइडर्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता. सुनील नारायण याने या सामन्यात मोठी कामगिरी केली नाही. त्याने आजच्या सामन्यात 9 चेंडूमध्ये 11 धावा केल्या आणि महिश तिक्षणा याने बाहेरचा रस्ता दाखवला. रहमानुल्लाह गुरबाज याने आज 25 चेंडूमध्ये 35 धावा केल्या. अजिंक्य रहाणे याने आज चांगली खेळी खेळली पण तो मोठी धावसंख्या उभी करण्याच अपयशी ठरला. त्याने आजच्या सामन्यात 24 चेंडूमध्ये 30 धावा केल्या आणि कॅप्टन रियान पराग याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Innings Break!
A big final flourish from Andre Russell helps #KKR get 8️⃣5️⃣ from the last 5 overs and set a 🎯 of 2️⃣0️⃣7️⃣ 🔥#RR‘s reply coming up 🔜
Scorecard ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/GOaqsj92Aj
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
अंगकृष रघुवंशी याने संघासाठी आणखी एकदा चांगली खेळी खेळली. त्याने आजच्या सामन्यात 31 चेंडूमध्ये 44 धावा केल्या यामध्ये त्याने 5 चौकार मारले. आंद्रे रसेलने आज धावांचा पाऊस पाडला. त्याने आज कमालीचा खेळ दाखवला. आंद्रे रसेलने 25 चेंडूमध्ये 57 धावा केल्या आणि नाबाद राहिला. यामध्ये त्याने 6 षटकार आणि 4 चौकार मारले. रिंकु सिंह हा शेवटच्या काही चेंडु शिल्लक असताना फलंदाजीला आला. त्याने या सामन्यात 6 चेंडूमध्ये 19 धावा केल्या.
राजस्थानच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाने 4 विकेट्स घेतले. महिश तिक्षणाने 1 विकेट घेतला. यामध्ये त्याने रहमानुल्लाह गुरबाजला आऊट केले. जोफ्रा आर्चर संघाला 1 विकेट मिळवून दिला. युधवीर सिंह याने आज 1 विकेटची कमाई करुन दिली तर रियान पराग याने 1 विकेट घेतला. आजच्या सामन्यात यशस्वी जयस्वालकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. वैभव सुर्यवंशीने संघासाठी ऐतिहासिक शतक झळकावले आहे. पण मुंबईच्या संघाविरूध्द खास कामगिरी करु शकला नाही.