फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
T२० विश्वचषक २०२४ : ३ ऑक्टोबरपासून T२० विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांमध्ये ही स्पर्धा मनोरंजक होत चालली आहे. विश्वचषकाचे आयोजन यूएई मध्ये करण्यात आले आहे. टीम इंडियाच्या विश्वचषकातील कामगिरीवर नजर टाकली तर, भारतीय महिला संघाने T२० विश्वचषकातील पहिला सामना गमावला होता. भारताच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर काल भारताच्या संघाचा सामना त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध झाला. यामध्ये भारताच्या महिला संघाने दमदार कमबॅक करत विश्वचषकाच्या गुणतालिकेमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय महिला संघाचा तिसरा सामना श्रीलंकाविरुद्ध पार पडणार आहे.
पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने १०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १८.५ षटकांत लक्ष्य गाठले. अशा परिस्थितीत, पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी प्रवेश करू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?
T२० विश्वचषक २०२४ मधील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानला १०५ धावांवर रोखले. भारताकडून अरुंधती रेड्डीने ३ बळी घेतले. श्रेयंकाने २, तर रेणुका, दीप्ती आणि आशा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. फलंदाजी करताना शेफाली वर्माने सर्वाधिक ३२ धावा केल्या.
आता पाकिस्तानविरुद्ध ६ विकेटने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर आहे. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपल्या ग्रुप स्टेजचे उर्वरित सामने जिंकावे लागतील. भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा लागेल.