फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Kolkata Knight Riders defeated Rajasthan Royals by 7 wickets : राजस्थान विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज सामना खेळवण्यात आला या सामन्यमध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला ८ विकेटने पराभूत केले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने संघासाठी विजयी खेळी खेळली. तर या सामन्यांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे फार मोठी खेळी खेळू शकला नाही. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आणखी एकदा निराशाजनक कामगिरीमुळे त्याला १८ व्या सीझनमधील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
First win at our second home💜🚀 pic.twitter.com/sQo2gmQkDn
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2025
राजस्थान विरुद्ध कोलकाता आजच्या सामन्यांमध्ये कॅप्टन अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये राजस्थानच्या संघाने पहिले फलंदाजी करत १५२ धावांची धावसंख्या उभी केली. हा सामना कोलकाता नाईट राइडर्सने १५ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य पूर्ण केले आहे. या सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉकने संघासाठी कमालीचा खेळ दाखवला होता, क्विंटन डी कॉकने संघासाठी ६१ चेंडूंमध्ये ९७ धावांची दमदार खेळी खेळून सामना एकतर्फी जिंकला.
Q for Quality, Q for Quinton 👌👌
A sensational unbeaten 9⃣7⃣ runs to seal the deal ✅
Scorecard ▶ https://t.co/lGpYvw87IR#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders pic.twitter.com/kbjY1vbjNL
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
मागील सामना आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद रियान परागकडे होते. युवा खेळाडू असल्यामुळे तो फलंदाजीमध्ये सुद्धा विशेष कामगिरी करू शकला नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनी संघासाठी या सामन्यात कमालीची कामगिरी करून दाखवली. वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी संघासाठी २-२ विकेट्सची कमाई केली. तर हर्षित राणा आणि मोईन अली यांनी संघासाठी २-२ विकेट्स घेतले आहेत. स्पेन्सन जॉन्सनने संघासाठी १ विकेट घेतला.
IPL 2025 : मोठी अपडेट! लेकीच्या जन्मानंतर KL Rahul दिल्ली कॅपिटल्ससाठी दुसरा सामना खेळणार का?
आरआरकडून यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २८ चेंडूत पाच चौकारांसह ३३ धावांची खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने २४ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले, ज्यात दोन चौकार आणि तितकेच षटकार होते. कार्यवाहक कर्णधार रियान परागने १५ चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. जोफ्रा आर्चर १६ धावा काढून तर संजू सॅमसन १३ धावा काढून परतला. नितीश राणा (८), वानिंदू हसरंगा (४), शुभम दुबे (९) आणि शिमरॉन हेटमायर (७) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.