Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey Asia Cup मध्ये धक्कादायक निकाल! मलेशियाकडून गतविजेत्या कोरियाचा पराभव; तर बांगलादेशने चायनीज तैपेईला चारली धूळ 

हॉकी आशिया कपमध्ये दोन धक्कादायक निकाल लागले आहेत. शनिवारी मलेशियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. त्याच वेळी, बांगलादेशकडून चायनीज तैपेईला पराभवाचा सामना करावा लागला. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 30, 2025 | 09:48 PM
Shocking results in Hockey Asia Cup! Defending champions Korea lose to Malaysia; Bangladesh thrash Chinese Taipei

Shocking results in Hockey Asia Cup! Defending champions Korea lose to Malaysia; Bangladesh thrash Chinese Taipei

Follow Us
Close
Follow Us:

Hockey Asia Cup  2025 : भारतात सध्या बिहारमध्ये हॉकी आशिया कपचा थरार सुरू आहे. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत धक्कादायक निकाल लागला आहे. गतविजेत्या दक्षिण कोरियाला मलेशियाने मोठा धक्का दिला आहे. दक्षिण कोरियाची या स्पर्धेत  पराभवाने सुरुवात झाली आहे. शनिवारी मलेशियाकडून दक्षिण कोरियाचा ४-१ ने  पराभव करण्यात आला.  त्याच वेळी, बांगलादेशने देखील  चायनीज तैपेईला हरवून पहिला विजय नोंदवला आहे.

हेही वाचा : Ashes series पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! न्यूझीलंड दौऱ्यासाठी Pat Cummins ला विश्रांती देणार

बांगलादेशकडून चायनीज तैपेईचा पराभव

दिवसाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने आपला दबदबा कायम ठेवला. बांगलादेश संघाने शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये पाच गोलची कमाई केली. बांगलादेशकडून मोहम्मद अब्दुल्ला (४थे आणि २६वे मिनिट), रकीबुल हसन (४२वे आणि ४३वे मिनिट) आणि अशरफुल इस्लाम (४५वे आणि ५८वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर सोहानूर सोबुज (३६वे मिनिट) आणि रेझाउल बाबू (५६वे मिनिट) यांनीही गोल केले. तर चायनीज तैपेईकडून त्सुंग-यू ह्सीह (१०वे आणि १८वे मिनिट) यांनी दोन गोल केले तर त्सुंग-जेन शिह (६०वे मिनिट) यांनी अंतिम हॉटरपूर्वी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. अशा प्रकारे बांगलादेशने चायनीज तैपेईचा ८-३  असा पराभव केला. बांगलादेश आता सामना १ सप्टेंबर रोजी कोरियाशी भिडणार आहे. तर चायनीज तैपेईचा सामना त्याच दिवशी मलेशियाशी दोन हात करेल.

कोरियाला पराभवाचा धक्का

दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात, पाच वेळा विजेत्या कोरियाला परभवाचा सामाना करावा लागला. कोरियाने दुसऱ्या मिनिटाला जिओनह्यो जिनच्या मैदानी गोलने आघाडी मिळवली.  त्यानंतर कोरियाचा आत्मविश्वास वाढला परंतु अखिमुल्लाह अन्वरने हॅटट्रिक केल्याने मलेशियाने कोरियाच्या गतीला चांगलाच  ब्रेक लावला. अन्वर व्यतिरिक्त, अशरन हमसानीनेही एक गोल केला. अखिमुल्लाह अन्वरकडून  २९ व्या, ३४ व्या आणि ५८ व्या मिनिटाला गोल करण्यात आले. मलेशियाकडून दक्षिण कोरियाचा ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 : यश धुळचे दमदार शतक, उत्तर विभागाची ५६३ धावांसह मजबूत आघाडी; पूर्व विभाग पराभवाच्या छायेत

या पराभवामुळे कोरियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीत मलेशिया १२ व्या स्थानावर विराजमान आहे. तर कोरियाचा संघ १३ व्या स्थानावर आहे. तथापि, यानंतरही या सामन्यात कोरियाला प्रबळ दावेदार मानण्यात आले होते.

Web Title: Korea loses to malaysia chinese taipei loses to bangladesh in hockey asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 
1

Asia cup 2025 : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका! BCCI च्या झोळीत १०० कोटी रुपयांची ‘माया’; वाचा सविस्तर 

Asia Cup 2025 ची ट्राॅफी मिळाली नाही तरी BCCI ला झाला 100 कोटी रुपयांचा फायदा! मोहसिन नक्वी काहीच करु शकला नाही
2

Asia Cup 2025 ची ट्राॅफी मिळाली नाही तरी BCCI ला झाला 100 कोटी रुपयांचा फायदा! मोहसिन नक्वी काहीच करु शकला नाही

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा बदडलं! आता सलमान आगाची कर्णधारपदावरून सुट्टी? वाचा सविस्तर 
3

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा बदडलं! आता सलमान आगाची कर्णधारपदावरून सुट्टी? वाचा सविस्तर 

अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर 
4

अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.