पॅट कमिन्स(फोटो-सोशल मीडिया)
NZ vs AUS : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून मोठी बातमी समोर आली आहे. कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आगामी टी-२० मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्याच्या विचारात आहे. वर्षाच्या शेवटी खेळवण्यात येणाऱ्या नावाजलेल्या अॅशेस मालिकेसाठी त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. यावेळी अॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आयोजित करणार आहे.
कोड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कॅरिबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याच्या पाठीत जडपणा जाणवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो सावधगिरीने स्कॅन करण्यात येणार आहे. कमिन्स वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांत खेळला नाही. कारण ऑस्ट्रेलियन संघ त्याच्या कामाचे व्यवस्थापन करणार आहे.
ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांचे पूर्ण लक्ष अॅशेस मालिकेवर असणार आहे. तो न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तथापि, तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
जोश हेझलवूडने सांगितले की ऑस्ट्रेलियाचे कसोटी वेगवान गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत आहेत. पत्रकारांशी बोलताना हेझलवूड म्हणाला की, कसोटी खेळाडू एकापेक्षा जास्त शिल्ड सामने खेळणार आहेत. कदाचित दोन किंवा तीन, पण प्रत्येकाचा कार्यक्रम वेगळा असतो. मी गेल्या वर्षी याचा वापर केला होता आणि तो खूप फायदेशीर ठरला होता. मैदानावर वेळ घालवणे, एका दिवसात अनेक स्पेल टाकणे, जे सरावात करणे खूप कठीण आहे. असे मत जोश हेझलवूडने मांडले.
हेही वाचा : रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट
हेझलवूड पुढे म्हणाला की “गेल्या १२ महिन्यांत मला मला असे वाटत आले आहे की, माझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगले खेळत राहणे आहे आणि सातत्याने गोलंदाजी करत राहणे. जर मी नेहमीच सामन्याच्या स्थितीत राहिलो तर ते दीर्घकाळ प्रभावी राहणारे आहे. वेगवान गोलंदाज म्हणून पुढे जाण्याचा हा सर्वोत्तम एक मार्ग आहे.” असे हेझलवूड म्हणाला.
कमिन्सला विश्रांती देण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची खोली तपासण्यात येत आहे. वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस, स्पेन्सर जॉन्सन आणि बेन द्वारशुइस हे सर्व दुखापतींमधून सध्या सावरत आहेत, त्यामुळे कमिन्स, हेझलवूड, मिशेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड यांच्यावर अॅशेस मालिकेदरम्यान आक्रमणाची जबाबदारी असणार आहे.