यश धुळ(फोटो-सोशल मीडिया)
Duleep Trophy Quarter-Finals : सध्या दुलीप ट्रॉफीचा थरार सुरू आहे. या ट्रॉफीच्या क्वार्टर-फायनल-१ मध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, उत्तर विभागाने सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी संघाने एकूण ५६३ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात दोन विकेट गमावल्यानंतर उत्तर विभागाने ३८८ धावा उभारल्या आहेत. त्यामुळे आता पूर्व विभाग आता परभवाच्या छायेत दिसत आहे.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरेलल्या उत्तर विभागाच्या संघाने पहिल्या डावात ४०५ धावा उभारल्या होत्या. संघासाठी कन्हैया वाधवानने १५२ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय, आयुष बदोनीने ६० चेंडूत ६३ धावांची खेळी सकारली. विरोधी संघाकडून मनीषीने १११ धावांत सर्वाधिक ६ बळी टिपले. तर सूरज जयस्वालने २ जण माघारी पाठवले.
प्रतिउत्तरात पूर्व विभागाची स्थिती वाईट झाली. संघ पहिल्या डावात फक्त २३० धावांतच गारद झाला. पूर्व विभाग संघाची सुरुवात खूपच वाईट झाली. पूर्व विभागाने फक्त ६६ धावांत आपले ३ बळी गमावले. येथून कर्णधार रायन पराग संघाची धुरा सांभाळत असल्याचे चित्र दिसले परंतु तो संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला. पूर्व विभागाकडून विराट सिंगने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. याशिवाय उत्कर्ष सिंगने ३८, तर रायन परागने ३९ धावा केल्या. उत्तर विभागाकडून आकिब नबीने सर्वाधिक ५ बळी, तर हर्षित राणाने २ बळी टिपले.
पहिल्या डावाच्या आधारे उत्तर विभागाकडे १७५ धावांची आघाडी होती. त्यात भर टाकत दुसऱ्या डावात संघाकडून शानदार सुरुवात केली. कर्णधार अंकित कुमारने शुभम खजुरियासोबत पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. शुभम २१ धावा करून माघारी गेला. त्यानंतर कर्णधाराने यश धुळसोबत दुसऱ्या विकेटसाठी २४० धावांची मोठी भागीदारी करून संघाला बळकट स्थितीत पोहचवले. यशने १५७ चेंडूचा सामना करत १३३ धावा केल्या. त्यात त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यानंतर तो बाद झाला.
हेही वाचा : रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट
उत्तर विभागाने २९४ धावांवर आपली दुसरा गडी गमावला येथून, अंकित कुमारने आयुष बदोनीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि दिवसअखेर संघाला ४०० धावांच्या जवळ आणून ठेवले. अंकितने दुसऱ्या डावात २६४ चेंडूंचा करत नाबाद १६८ धावा केल्या. यादरम्यान, त्याने एक षटकार आणि १६ चौकार लगावले. त्याच वेळी, आयुष ५६ धावा करून नाबाद आहे. पूर्व विभागाकडून सूरज जयस्वाल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला आहे.