Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs NZ : कुसल परेराच्या शतकाने श्रीलंकेने केला न्यूझीलंडचा पराभव, 219.57 च्या स्ट्राइक रेटने खेळली खेळी

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये नुकताच सामना झाला यामध्ये कुसल परेराने शतक ठोकून श्रीलंकेला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने या मालिकेमध्ये यजमानांनी तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकल

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 02, 2025 | 11:04 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड : कुसल परेराचे शतक आणि श्रीलंकेच्या विजयाने २०२५ वर्षाची सुरुवात झाली. या वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नेल्सन येथील सॅक्सटन ओव्हल येथे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कुसल परेराच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघ श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला. मात्र, यजमानांनी तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येसमोर किवी संघ निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून २११ धावाच करू शकला.

Gautam Gambhir Press Conference : धक्कादायक! रोहित शर्माचा सिडनी कसोटीतून पत्ता कट? गौतम गंभीरच्या उत्तराने थक्क

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा अहवाल

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने ४९ धावा केल्या पण दोन विकेटही गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुसल परेराने ४६ चेंडूत १३ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी करत संघाला २१८ धावांपर्यंत नेले. त्याच्याशिवाय कर्णधार चारिथ असलंकाने २४ चेंडूत ४६ धावांची तुफानी खेळी केली. कुसल परेरा महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांच्यानंतर श्रीलंकेसाठी T२० मध्ये शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. १४ वर्षांनंतर श्रीलंकेच्या खेळाडूने T20 मध्ये शतक झळकावले आहे.

T20 मध्ये श्रीलंकेचे शतक

१०० – महेला जयवर्धने, २०१०
१०४*- तिलकरत्ने दिलशान, २०११
१०१ – कुसल परेरा, २०२५

Runs: 101
Balls: 46
4s/6s: 13/4
SR: 219.57

Kusal Perera slams his first T20I 💯, against New Zealand 🔥🔥🔥 #NZvsSL pic.twitter.com/JbRUwgZArA

— Cricbuzz (@cricbuzz) January 2, 2025

झीलंडच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर रचिन रवींद्रने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या आणि सहकारी फलंदाज टिम रॉबिन्सन (३७) सोबत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली, परंतु असे असतानाही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. डॅरेल मिशेल मधल्या फळीत आला आणि त्याने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या, पण तो शेवटपर्यंत टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने सर्वाधिक ३ बळी घेतले. कुसल परेराला त्याच्या झंझावाती शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

IND vs AUS : सिडनी कसोटीवर काळे ढग! WTC फायनलच्या आशा भंग होणार? जाणून घ्या हवामानाचा अहवाल

कुशल परेरा आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यासह त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडीत काढला आहे. २०११ मध्ये, दिलशानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावले. या सामन्यात दिलशानने ५५ चेंडूत शतक झळकावले होते.

Web Title: Kusal perera century sri lanka to defeat new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • cricket

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.