फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी गौतम गंभीरची पत्रकार परिषद : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या फॉर्म आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितचे संघात पुनरागमन झाल्यापासून भारताने एकही सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत रोहितच्या संघावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. उद्या म्हणजेच ३ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेमध्ये टीम इंडिया सध्या १-२ अशी पिछाडीवर आहे. भारताच्या संघाने केलेल्या खराब फलंदाजीमुळे भारताच्या संघाला चौथा गमवावा लागला. भारताच्या अनेक फलंदाजांनी या मालिकेमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. यामध्ये रिषभ पंत, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सामन्याच्या एक दिवस आधी गौतम गंभीरला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने आपल्या उत्तराने वातावरण तापवले.
IND vs AUS : सिडनी कसोटीवर काळे ढग! WTC फायनलच्या आशा भंग होणार? जाणून घ्या हवामानाचा अहवाल
गुरुवारी 2 जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला थेट प्रश्न विचारण्यात आला की रोहित सिडनी कसोटी खेळणार का? तर त्याने उत्तर दिले, ‘आम्ही उद्या खेळपट्टी पाहून टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची निवड करू.’ मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघात फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्माबाबत दिलेले उत्तर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधाराचा समावेश करण्याबाबत प्रशिक्षकाला खात्री नसेल तर अडचण आहे.
मात्र, पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने आकाशदीपबाबत अपडेट दिले की, दुखापतीमुळे तो मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकणार नाही. जर प्रशिक्षक एखाद्या खेळाडूचे फिटनेस अपडेट देऊन तो खेळणार की नाही हे सांगू शकत असेल तर त्याने कर्णधारावर विश्वास दाखवायला हवा होता.
याशिवाय गौतम गंभीर संघातील मतभेदाबाबतच्या बातम्यांबाबत म्हणाला, “खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील वाद हा त्यांच्यामध्येच राहिला पाहिजे. ड्रेसिंग रूममध्ये होणारे कोणतेही संभाषण ड्रेसिंग रूममध्येच राहिले पाहिजे.” ते म्हणाले, “हे फक्त अहवाल आहेत, सत्य नाही, मला कोणत्याही अहवालावर भाष्य करण्याची गरज नाही. “प्रामाणिकपणा महत्वाचा आहे, आम्हाला पुढे जायचे आहे आणि काही महान गोष्टी साध्य करायच्या आहेत.”
GAMBHIR TALKING ABOUT ROHIT SHARMA IN PRESS CONFERENCE. [OneCricket] pic.twitter.com/gWANcHsgIP
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील होणारा मालिकेचा शेवटचा पाचवा सामना फार महत्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जागा पक्की करण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताच्या संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.