
१६ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदी म्हणाले की, १६ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर त्यांना न्याय मिळाला आहे. ते म्हणाले की,’मी या निर्णयाने खूप आनंदी आहे. मी १६ वर्षे लढलो आणि अखेर सत्य समोर आले आहे. आता हे प्रकरण संपले आहे आणि मला माझ्या आयुष्यात पुढे जायचे आहे. मी भारतात परतण्यास उत्सुक आहे.’
ललित मोदी पुढे म्हणाले की, ‘मी कदाचित या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईन. माझी मुलगी ऑक्टोबरमध्ये माझ्या नातवाला जन्म देणार आहे. त्यानंतर भारतात परत येण्याचा माझा विचार आहे.’
#WATCH | IPL founder and first chairman Lalit Modi to return to India. He says, “I’m really happy with the verdict yesterday. It’s really been a great day. 16 years I have fought and whatever I have been saying to the media and to everybody has finally emerged as the truth. I’m… pic.twitter.com/QTN7VkzuEy — ANI (@ANI) July 22, 2026
स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्ट (SAFEMA) अंतर्गत गठीत केलेल्या अपीलीय न्यायाधिकरणाने, १६ जुलै रोजी दिलेल्या आपल्या निकालात,ईडीने (ED) लादलेले बहुतेक निष्कर्ष आणि दंड रद्द केले. न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, २००९ च्या आयपीएलच्या आयोजनाशी संबंधित फेमा कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी ललित मोदी जबाबदार होते हे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर कोणताही ठोस पुरावा नाही.
२००९ मध्ये, लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. या काळात, ईडीने (ED) स्पर्धेसाठी परदेशात पाठवलेल्या निधीची चौकशी सुरू केली. ईडीने आरोप केला की, या परदेशी देयकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) पूर्वपरवानगी आवश्यक होती, परंतु परकीय चलन व्यवहार परवानगीशिवाय करण्यात आले. परंतु, अपीलीय न्यायाधिकरणाने आपल्या निर्णयात म्हटले की, दक्षिण आफ्रिकेतील आयपीएलशी संबंधित परदेशी देयके ही करंट अकाउंटमधील व्यवहार होते, कॅपिटल अकाउंटमधील व्यवहार नव्हते. तसेच, न्यायाधिकरणाने ललित मोदी यांच्यावर लावलेला १०.६५ कोटी रुपयांचा दंड रद्द केला. तत्कालीन बीसीसीआय सचिव एन. श्रीनिवासन यांच्यावर लावलेला दंड १ कोटी रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आला.