David Warner अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; जेलची टांगती तलवार
भारताने या खेळांसाठी ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडू (पॅरा-क्रीडांसह) पाठवले आहेत. १९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल खेळांची ही २३ वी आवृत्ती आहे. आतापर्यंत झालेल्या २२ आवृत्त्यांपैकी केवळ चार आवृत्त्यांमध्ये (१९३०, १९५०, १९६२ आणि १९८६) भारतीय संघाने भाग घेतला नव्हता.
यावेळी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या वेळी स्पर्धा आयोजित केल्या जातील. भारतातील फॅन्स सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनवलवर राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धा पाहू शकतात. तर त्यांचे थेट प्रक्षेपण डीडी फ्री डिशद्वारे डीडी स्पोर्ट्स चॅनलवर विनामूल्य केले जाईल. स्पर्धांच्या थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲपवर केले जाईल. राष्ट्रकुल खेळांचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी होणार असून, तो भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता सुरू होईल, ज्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरहेगन भारतीय पथकाची ध्वजवाहक असतील.
𝐑𝐞𝐚𝐝𝐲, 𝐬𝐞𝐭… 𝐬𝐚𝐯𝐞 𝐭𝐡𝐞 𝐝𝐚𝐭𝐞𝐬! 🔔 Swipe to see Team India’s discipline-wise competition dates ⏩ Watch the Commonwealth Games Glasgow 2026 exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026… pic.twitter.com/NoqrtDoXFq — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 22, 2026
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आकर्षणाचे केंद्र असेल, जिथे तो ३० जुलै रोजी आपल्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार आणि जस्मिन लंबोरिया यादेखील चर्चेत असतील. चाहते वेटलिफ्टिंगमधील मीराबाई चानूच्या कामगिरीचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.
२४ जुलै
IND vs ZIM: टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स






