Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी 

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 05, 2025 | 04:12 PM
'Sports' turn bloody in Punjab! Kabaddi player shot dead in Ludhiana; 'This' gang claims responsibility

'Sports' turn bloody in Punjab! Kabaddi player shot dead in Ludhiana; 'This' gang claims responsibility

Follow Us
Close
Follow Us:

Kabaddi player Gurvinder Singh shot dead: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या राज्यातील  क्रीडा जगतावर पुन्हा एकदा गुन्हेगारीचे वादळ घोंघावू लागले आहेत. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी पुढे आली आहे. हत्या झालेल्या खेळाडूचे नाव गुरविंदर सिंग असे असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तापसाला सुरुवात झाली आहे.

एका वृत्तानुसार, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची  जबाबदारी स्वीकारली आहे. टोळीशी संबंधित असलेल्या अनमोल बिश्नोईने सोशल मीडिया पोस्टमध्ये या गुन्ह्याची कबुली दिली असून पोस्टमध्ये हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई या दोघांची नावे आहेत. अनमोलने पोस्टमध्ये  लिहिले आहे की “ही हत्या त्याचे सहकारी करण माडपूर आणि तेज चक यांनी केली आहे.” या पोस्टसह, पंजाब पोलिस पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. या हत्येने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Virat Kohli Birthday Special : ODI क्रिकेट इतिहासात ‘किंग’ कोहलीच्या ‘ त्या’ खास खेळी; ‘रन मशीन’ चे बिरुद लावणाऱ्या ठरल्या

सोशल मीडियावर दिली उघड धमकी

अनमोल बिश्नोईच्या पोस्टने केवळ हत्येची जबाबदारीच स्वीकारली नसून तर स्पष्ट इशारा देखील दिला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते, “हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) आज एका कबड्डी खेळाडूच्या हत्येची जबाबदारी घेतात. जो कोणी आपल्या शत्रूंना पाठिंबा देईल त्याला देखीलअसेच नशिब येईल.” या धमकीवरून हे आता स्पष्ट होते की ही टोळी पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांच्या नेटवर्कचा वापर करत असल्याचे दिसत आहे. .

कबड्डी खेळाडूंना लक्ष्य होत आहेत का?

पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या केल्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये लुधियानामध्ये कबड्डी खेळाडू तेजपालची देखील हत्या करण्यात आली होती. आता, गुरविंदर सिंगच्या हत्येमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून कबड्डीसारख्या खेळात गुन्हेगारीची घुसखोरी कधी थांबणार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल

पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूंची हत्या कधी झाली?

  1. ३१ ऑक्टोबर २०२५: लुधियानामध्ये कबड्डी खेळाडू तेजपालची हत्या.
  2. ६ जून २०२५ : पंचकुलामध्ये राष्ट्रीय खेळाडू सोनू नोल्टाची हत्या, अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले.
  3. २०१६ : कबड्डी खेळाडू अजमेर सिंगचा बनावट एन्काउंटर.
  4. २३ सप्टेंबर २०२३: कपूरथलामध्ये हरदीप सिंगची तलवारीने हत्या.
  5. १४ मार्च २०२२: जालंधरमध्ये संदीप नंदल अंबियाची गोळ्या घालून हत्या.
  6. एप्रिल २०२२: पटियालामध्ये धर्मेंद्र सिंगची हत्या.
  7. मे २०२०: कपूरथलामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू अरविंदरजीत सिंग पद्डा यांची हत्या.
  8. ऑगस्ट २०२०: बटालामध्ये गुरमेजची गोळ्या घालून हत्या.
  9. नोव्हेंबर २०२५: सुखविंदर सिंग उर्फ ​​नोनीची तरणतारनमध्ये गोळ्या घालून हत्या.

Web Title: Lawrence bishnoi gang claims responsibility for shooting dead kabaddi player in ludhiana punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Kabaddi Tournament
  • Lawrence Bishnoi
  • Murder News
  • Punjab News

संबंधित बातम्या

Pro Kabaddi League S12 : दबंग दिल्लीचा जलवा कायम! दुसरे PKL जेतेपद केले नावावर; पुणेरी पलटनला चारली धूळ 
1

Pro Kabaddi League S12 : दबंग दिल्लीचा जलवा कायम! दुसरे PKL जेतेपद केले नावावर; पुणेरी पलटनला चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.