
Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय)ने निश्चित केले आहे की, एशियन गेम्समधील पदक विजेते कजाकिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2027 मध्ये थेट सहभागी होतील. ही लॉस अँजिल्स 2028 ऑलिम्पिकसाठी अधिकृत क्वालिफायिंग स्पर्धा असेल. लवलिना याचा पूर्ण फायदा घेत लवकरात लवकर ऑलिम्पिकमध्ये आपली जागा पक्की करू इच्छिते.
लवलिनाने रविवारी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ज्यात ती म्हणाली की, आम्ही नेहमीच पहिल्याच क्वालिफिकेशनमध्ये पात्र ठरण्याचा प्रयत्न करतो. एका अॅथलेटिक्ससाठी ती चांगली बाब असते. ज्याप्रकारे हॉकी संघाने केले, त्यांना आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मोठा वेळ हातात आहे. त्याचमुळे आमचे लक्ष्य अगोदर क्वालिफिकेशनसाठी पात्रता मिळवणे व चांगले निकाल प्राप्त करणे हेच असते.
लवकर पात्रता मिळवल्यानंतर लवलिना व इतर यशस्वी बॉक्सर्सला ऑलिम्पिकच्या खास तयारीसाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल. जे अॅथलीट अगोदरपासून खेळांच्या गरजा समजतात, त्यांच्यासाठी लवकरात लवकर ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे गरजेचे ठरणार आहे.
एशियन गेम्समध्ये लवलिनाच्या विजयाने तिच्या विश्वासाला आणखीन बळकटी प्राप्त झाली आहे. दरम्यान, पॅरिसमधील कटु आठवणींना मागे सारत ती सध्या तिच्या आयुष्यात जे सुरू आहे त्याचा आनंद घेऊ इच्छिते. ती म्हणते की, मी तसं काही विचार केला नाही. मी या वेळेवर विजय मिळवला आहे. हे माझे मेडल आहे. मला फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे. मला कोणालाच उत्तर द्यायचं नाही. मला काहीच सिद्ध करायचं नाही. मला वाटते की, प्रत्येक जण कठोर मेहनत घेत असते.
हॅवीवेट आणि लाइटवेट दोन्ही प्रकारचे बॉक्सर बरोबर मेहनत करतात. कधी मेडल मिळते, केव्हा नाही. पण मेहनत कमी होत नाही. मला ठाऊक आहे की, आम्ही कॅम्पमध्ये राहतो. प्रत्येक अॅथलीट खूप मेहनत घेत असतो. आमच्या अॅथलीट्सच्या विचारात कुठे ना कुठे बदल घडला आहे. आमच्यात विजेता होण्याची धमक आहे. त्यामुळे आम्ही चांगले खेळत आहोत.
एशियन गेम्समधील जिंकलेल्या पदकाबाबत लवलिना म्हणते की, हे देशासाठी अभिमानाचे क्षण आहेत. माझ्यासाठी तर सर्वात खास क्षण होते. जेव्हा मी पदक हातात घेतले व राष्ट्रगीत सुरू झाले, माझं मनं खूप भरूनआले. याच क्षणांसाठी अॅथलीट आपल्या कारकिर्दीत अथक मेहनत घेत असतो. अनेक आव्हानांचा सामना करतो.