
फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Nicholas Pooran’s performance in IPL 2025 : लखनौच्या संघाने आज गुजरात टायटन्सविरुद्ध या स्पर्धेचा चौथा विजय नावावर केला आहे. संघाने या सामन्यात कमालीची फलंदाजी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज सध्या या सीझनमध्ये कमालीचा खेळ दाखवत आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि एडन मार्करम हे दोघीही कमालीची सुरुवात करत आहेत. यामध्ये संघाचा धुव्वादार फलंदाज निकोलस पूरनने आयपीएलचा १८ वा सीझनचा चांगलाच गाजवला आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा पहिला सामना कोलकाता नाईट राइडर्सविरुद्ध झाला या सामन्यात निकोलस पुरनने संघासाठी २९ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने त्याचे संघामधील अस्तित्व दाखवून दिले होते. त्यानंतर हैदराबादच्या संघाविरुद्ध त्याने ३० चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने ३० चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या आहेत. त्यानंतर संघाचा चौथा सामना मुंबई इंडियन्स विरुद्व झाला होता यामध्ये तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. यामध्ये पुरनने ६ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या.
LSG vs GT: लखनऊच्या ‘रन मशीन’ने पाडला षटकारांचा पाऊस; गुजरात टायटन्सचा 6 विकेट्सने दणदणीत पराभव
८ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झाला होता यामध्ये आणखी एकदा पुरनने त्याच्या खेळीने चाहत्यांचे मनोरंजन केले. कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये ३६ चेंडुंमध्ये ८७ धावा केल्या. आज लखनौच्या संघाने गुजरातविरुद्ध सामना खेळला या सामन्यात आणखी एक धुव्वादार खेळी संघासाठी खेळली. आजच्या सामन्यात पुरनने संघासाठी महत्वाची ३४ चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी खेळली.
Nicholas Pooran in IPL 2025: – 75 (30).
– 70 (26).
– 44 (30).
– 12 (6).
– 87* (36).
– 61 (34). The Beast 🔥❤️#IPL2025 #LSGvsGT #LSGvGT #GTvsLSG #NicholasPooran#Pooran pic.twitter.com/1B5u4KFlTt — ganga (@alwysports) April 12, 2025
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने चांगली सुरुवात केली. पंत आणि मार्कराम यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, पंत २१ धावा करून बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर, मार्कराम आणि पूरन यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. ही धोकादायक भागीदारी प्रसिद्ध कृष्णाने मोडली. त्याने मार्क्रमला ५८ धावांवर बाद केले. या काळात, पूरनने वेगवान गतीने धावा काढणे सुरूच ठेवले. तो ३४ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर, आयुष आणि मिलरने मिळून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, मिलर क्लीन बोल्ड झाला. यानंतर, आयुष बदोनीने शेवटच्या षटकात 6 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.