फोटो सौजन्य - punjabkingsipl सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Gujarat Titans Match Report : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये इकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय त्यांना फायदेशीर पडला. लखनौ सुपर जायंट्सने या सीझनचा चौथा विजय नावावर केला आहे. गुजरात टायटन्सला लखनौने या सामन्यात 6 विकेटने पराभूत केले आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने या सामन्यात कमालीची सुरुवात केली होती पहिल्या डावांमध्ये १२ ओव्हरमध्ये संघाचा एकही विकेट गेला नाही. पण त्यानंतर दोन्ही सेट सलामीवीर फलंदाज बाद झाले आणि धावाना स्पीडब्रेकर लागला.
लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजचं सांगायचं झालं तर आज मिचेल मार्शच्या अनुपस्थित आज सलामीवीर फलंदाज म्हणून संघाचा कर्णधार रिषभ पंत फलंदाजीसाठी आला होता. त्याने १८ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या आणि झेलबाद झाला. एडन मार्करम याने या सीझनमध्ये दुसरे अर्धशतक झळकावले. मार्करमने संघासाठी ३१ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ९ चौकर मारले. निकोलस पुरन याने आणखी एकदा मोठी खेळी खेळली. त्याने येताच षटकारांचा पाऊस पडला. त्याने ३४ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने ७ षटकार आणि १ चौकार ठोकला.
Lucknow Super Giants seal a comfortable 6-wicket win against Gujarat Titans in their own backyard! 🙌#IPL2025 #LSGvGT #Sportskeeda pic.twitter.com/lwJz6X8L4j
— Sportskeeda (@Sportskeeda) April 12, 2025
डेव्हिड मिलर या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने ११ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या. अब्दुल समद याने ३ चेंडू खेळले आणि २ धावा केल्या. तर आयुष बडोनी याने संघासाठी महत्वाच्या २८ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि २ चौकार मारले. शेवटच्या चेंडूवर विजयाचा षटकार मारून सामना जिंकला. लखनौच्या फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यात रवी बिष्णोई आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स नावावर केले. तर दिग्वेश राठी आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली. अशाप्रकारे, दोन्ही फलंदाज आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणारे पहिले खेळाडू बनले. त्यांनी मिळून १२० धावांची भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णाने संघासाठी २ विकेट्स घेतले तर रशीद खान आणि वॉशिंग्टन सुंदर याने संघासाठी प्रत्येकी १ विकेट घेतला. लखनौचे विकेट घेण्यात गुजरात संघ अपयशी ठरला त्यामुळे संघाला या सीझनचा दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.