फोटो सौजन्य - IndianPremierLeague
सनरायझर्स हैदराबाद विरुद्द लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचा अहवाल : एकना मैदानावर आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात आला. आजच्या सामन्यात लखनऊच्या संघाला सलामी वीर फलंदाजांनी कमालीची सुरुवात करून दिली होती. या सामन्यात हैदराबादच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवला. या पराभवासह लखनऊच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा नष्ट झाल्या आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीचे कौतुक करायचे झाले तर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या दोघांनी संघासाठी आज कमालीची कामगिरी केली. अभिषेक शर्माने आजच्या सामन्यात 20 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या त्यामध्ये त्याने सहा षटकार आणि चार चौकार मारले. तर ईशान किशनने संघासाठी महत्त्वाच्या 35 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड सध्या संघाबाहेर आहे त्यामुळे त्याच्या जागेवर आजच्या सामन्यात अथर्व तायडे याला संधी मिळाली होती. आजच्या सामन्यात त्याच्या पदार्पण सामन्यात तो विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने नऊ चेंडू खेळला आणि या मध्ये त्याने 13 धावा केल्या.
Match 61. Sunrisers Hyderabad Won by 6 Wicket(s) https://t.co/GNnZh911Xr #LSGvSRH #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025
आजच्या सामन्यात हेनरिक क्लासेन याने संघासाठी महत्त्वाचे 47 धावा केल्या यांमध्ये त्याने एक षटकार आणि चार चौकार मारले. कमींडू मेंडीस फलंदाजीला आला होता त्याने 21 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या त्यानंतर त्याला दुखापतीमुळे रिटायर आऊट व्हावे लागले. लखनऊच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाने फक्त चार विकेट्स घेतले यामध्ये दिग्वेश राठी आणि संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. शार्दुल ठाकूरला आज संघामध्ये संधी मिळाली होती त्याने संघाला एक विकेट मिळवून दिला. तर पदार्पण करणारा विल ओरौर्क याने त्याच्या पहिल्याच सामन्यात एक विकेटची कमाई केली.
अभिषेक शर्मा – दिग्वेष राठी मैदानात भिडले! खेळाडूंमध्ये बाचाबाची, सोशल मीडियावर Video Viral
लखनऊच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर संघाचा कर्णधार आणखी एकदा फेल ठरला. मिचेल मार्श याने आजच्या सामन्यात 65 धावांची खेळी खेळली. तर एडन मार्क्ररम याने संघासाठी 61 धावांची खेळी खेळली. आजच्या सामन्यात लखनऊच्या गोलंदाजांची निराशोधन कामगिरी राहिली संघाच्या हाती फक्त चार विकेट्स लागले. ऋषभ पंत हा आयपीएलचा इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू होता पण तो या सीझनमध्ये त्याचे विशेष छाप पाडण्यात अपयशी ठरला.