
LSG vs GT Live Score (Photo Credit- X)
Innings Break! Prasidh Krishna’s best #TATAIPL figures keep #LSG to 164/8 🫡 Will #GT chase it down to register their second win of the season? 🤔 Updates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/eLON7m3k1X — IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना, लखनौ सुपर जायंट्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 164 धावा उभारल्या. शेवटच्या दोन षटकांत एकूण 33 धावा काढण्यात आल्या. लखनौकडून एडन मार्कराम हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला; त्याने 21 चेंडूंत 30 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावून मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार ऋषभ पंतने 11 चेंडूंत 18 धावा केल्या, निकोलस पूरनने 21 चेंडूंत 19 धावा केल्या, तर अब्दुल समदने 22 चेंडूंत केवळ 18 धावांचे योगदान दिले.
मागील सामन्याचा नायक ठरलेल्या मुकुल चौधरीने 18 चेंडूंत 18 धावांची खेळी केली. डावाच्या अखेरीस, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरलेल्या जॉर्ज लिंडेने 10 चेंडूंत 16 धावा केल्या, तर मोहम्मद शमी 5 चेंडूंत 12 धावा काढून नाबाद राहिला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला; त्याने आपल्या 4 षटकांत 28 धावा देऊन ४ बळी मिळवले.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसीद्ध कृष्णा
CSK is Back! संजूच्या वादळी खेळीसमोर DC हतबल; चेन्नईचा IPL मधला पहिला ‘सुपर’ विजय