
फोटो सौजन्य: X.com
अभिनंदन, ‘डबल महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर ! ६८व्या ‘महाराष्ट्र केसरी’वर नाव कोरल्याबद्दल पैलवान हर्षवर्धन सदगीर याचे मनःपूर्वक अभिनंदन ! दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमानही हर्षवर्धनने मिळवला असून त्याबद्दल त्याचे विशेष… pic.twitter.com/S2LbH6rJic — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 22, 2026
माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरचे महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचे सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. या लढतीत महेंद्र गायकवाडने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी 2 गुण मिळवले आणि त्यानंतर आणखी 1 गुण घेत 3-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे महेंद्र गायकवाडने हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
माती विभागाच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा पराभव केला, तर गादी विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलला मात दिली. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने आले.
महेंद्र गायकवाडने पहिल्या हाफमध्ये 1 गुण मिळवत आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने 1 गुण मिळवत सामना बरोबरीत आणला. यानंतर, पहिला हाफ 1-1 अशा बरोबरीत संपला. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाडला ॲक्टिव्हिटी टास्क’ देण्यात आला, मात्र त्यात त्याला गुण मिळवता आले नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पुढे हर्षवर्धनने आणखी दोन गुण मिळवत 4-1 अशी आघाडी घेतली. नंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्यामुळे महेंद्र गायकवाड यांना एक गुण मिळाला. अखेर वेळ संपेपर्यंत हर्षवर्धन सदगीरने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला.