Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports 2025: महाराष्ट्राच्या लेकीने केली आणखी एका पदकाची कमाई; सायकलिंगमध्ये जिंकले ‘रौप्य’

Kolhapur: आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 31, 2025 | 08:29 PM
38th National Sports 2025: महाराष्ट्राच्या लेकीने केली आणखी एका पदकाची कमाई; सायकलिंगमध्ये जिंकले ‘रौप्य’
Follow Us
Follow Us:

रुद्रपूर:  38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले.

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत पूजा हिने हे अंतर एक तास 45 मिनिटे 10.590 सेकंदात पार केले. सुवर्णपदक जिंकणार्‍या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास 45 मिनिटे 10.512 सेकंद वेळ लागला. स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राने रोड सायकलिंगमधील महिला गटाचे विजेतेपदावर नाव कोरले.

ही दोन्ही पदके पूजा दानोळेने जिंकून महाराष्ट्राची शान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचविली आहे. पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. पूजा हिला सुरुवातीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायकलींग अकादमीत अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

हेही वाचा: 38th National Sports 2025: कोल्हापूरच्या लेकीनं गाजवलं मैदान; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली ‘Gold Medal’ ची कमाई

उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे.

महिला गटात सलग दुसर्‍यांदा सोनेरी यश

ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्‍या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले.  ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.

हेही वाचा: 38th National Games: डेहराडूनमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक नेम; पार्थने पदार्पणातच जिंकले ‘Gold Medal’

कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदार

ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra kolhapur pooja danole won silver medal sycling game at dehradun 38th national sports 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • 38th India National Games

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.