महाराष्ट्राने ही दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे खेळाडू व चाहत्यांनी "जय शिवाजी, जय भवानी', 'जय महाराष्ट्र टीम महाराष्ट्र' अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले.
हरिवंशला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकणारा शिवा या खेळाडूचे 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक निश्चित मानले जात होते.
Pooja Danole: डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगमधील 3 किलोमीटर प्रकारात पूजा दानोळेने चार मिनिटे 04.494 सेकंदात अंतर पार करीत सलग तिसर्या पदकाचा नाव कोरले.
अंजली ही मुंबई येथे जे एस डब्ल्यू वासिंद अकादमी प्रशिक्षण घेत असून तिने शिव नाडर विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रात पदवी संपादन केली आहे. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच वैयक्तिक पदक आहे.
Kolhapur: आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली.
किरण जाधव हा सातारा जिल्ह्यातील भाटणवाडी या गावचा खेळाडू असून त्याने सन 2015 मध्ये सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव सुरू केला. या खेळातील त्याची कामगिरी बघून सेनादलात त्याची निवड…
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय.
डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघाची सलग दुसर्या विजेतेपदासाठी जय्यत तयारी सुरू आहे.