Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियन! Manchester Super Giants चा ‘द हंड्रेड’च्या ट्रॉफीवर कब्जा; गोएंका यांची पोस्ट चर्चेत

Manchester Super giants Won Men's the hundred: मँचेस्टर सुपर जायंट्सने पुरुषांच्या 'द हंड्रेड' स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. यानंतर, संघाचे मालिक संजीव गोएंका यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 17, 2026 | 02:43 PM
पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियन! Manchester Super Giants चा ‘द हंड्रेड’च्या ट्रॉफीवर कब्जा; गोएंका यांची पोस्ट चर्चेत
Follow Us
Follow Us:
  • मॅनचेस्टर सुपरजायंट्सचा ‘द हंड्रेड’च्या ट्रॉफीवर कब्जा
  • संजीव गोएंका यांची खास पोस्ट
  • टीम सेफर्टने धडाकेबाज खेळी
मँचेस्टर सुपर जायंट्सने पुरुषांच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या पुरुषांच्या ‘द हंड्रेड २०२६’ च्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ विकेट्सने पराभव केला. ‘द हंड्रेड’ स्पर्धा जिंकणारा मँचेस्टरचा संघ प्रथमच ठरला. अंतिम सामन्यात टीम सेफर्टने धडाकेबाज ७२ धावा करून आपल्या संघाला विजयाकडे नेले. क्रिकेटमध्ये संजीव गोएंका यांच्या संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. यानंतर, संजीव गोएंका यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

TREW vs SULW: आधी गोलंदाजांचा कहर, मग फलंदाजांचा प्रहार; Trent Rocketsचा दणदणीत ‘The Hundred’ विजय, लीड्सचा 8 विकेट्सनी सुपडा साफ

मँचेस्टर सुपर जायंट्सने जिंकले द हंड्रेड विजेतेपद

द हंड्रेड लीग २०२६ चा अंतिम सामना १६ ऑगस्ट रोजी मँचेस्टर सुपर जायंट्स आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना, रॉकेट्सने १०० चेंडूंमध्ये १५८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, टिम सायफर्टने ३८ चेंडूंमध्ये ७२ धावांची धडाकेबाज खेळी करून एमएसजीच्या विजयाचा पाया रचला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि सात षटकार मारले. जोस बटलर आणि ल्यूस डी प्लोय यांनीही छोट्या खेळी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

विजयानंतर गोएंका यांची खास पोस्ट

हा विजय संजीव गोएंका यांच्यासाठीही खास होता, कारण मँचेस्टर सुपरजायंट्सने त्यांच्या क्रिकेट फ्रँचायझीसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात केली. गोएंका हे आयपीएलच्या लखनौ सुपरजायंट्सचे सह-मालक देखील आहेत.

मात्र, यावेळी विजेतेपद जिंकल्यानंतर ते खूपच भावूक झालेले दिसले. त्याने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघाचे अभिनंदन करताना लिहिले, ‘पहिल्याच हंगामात चॅम्पियन्स! लॉर्ड्सवरची ही रात्र अविस्मरणीय होती. आम्हा सर्वांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.’

त्यांनी पुढे लिहिले की, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत हा सांघिक प्रयत्न होता. टिम, काय शानदार खेळी होती. नूर, गोलंदाजीचा अप्रतिम स्पेल आणि गरजेच्या वेळी विकेट्स. जोसने संपूर्ण हंगामात आघाडीवरून नेतृत्व केले. नॉकआऊट फेरीत संपूर्ण संघ ज्या प्रकारे एकत्र आला, त्यामुळे हा हंगाम बदलला. जोस आणि हे शक्य करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. आमच्या फॅन्सचे विशेष आभार. तुम्ही सर्वांनी या संघाला शेवटपर्यंत पोहोचवले. हा विजय तुम्हा सर्वांसाठी आहे.’

Champions in our very first season! @ManchesterSG100 What a night it has been at Lord’s, a proud moment for all of us in the Super Giants family. This was a team effort from the first game to the last. Tim, what an innings. Noor, a brilliant spell with the ball and wickets at… pic.twitter.com/fNOO18Wpfe — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) August 16, 2026

मँचेस्टर ओरिजिनल्समधून ते मँचेस्टर सुपरजायंट्स

मँचेस्टर सुपरजायंट्स हा संघ पूर्वी मँचेस्टर ओरिजिनल्स म्हणून ओळखला जात होता. या वर्षी, संजीव गोएंका यांनी संघाची मालकी घेतली आणि फ्रँचायझीचे नाव बदलून मँचेस्टर सुपरजायंट्स असे ठेवले. आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद जिंकल्यामुळे हा बदल अविस्मरणीय ठरला.

BWF World Championships 2026: दिल्लीत रंगणार ‘शटल वॉर’! जगातील दिग्गज भिडणार, कधी आणि कुठे पाहाल सामने?

Web Title: Manchester super giants won the hundred 2026 champion sanjiv goenka post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Jos Buttler
  • Manchester
  • Sanjiv Goenka
  • The Hundred 2026

संबंधित बातम्या

अबब! नुसता राडाचं; Jos Buttler दहा हजारी’ धमाका! वनडे-टी20 मध्ये इंग्लंडचा पहिला फलंदाज
1

अबब! नुसता राडाचं; Jos Buttler दहा हजारी’ धमाका! वनडे-टी20 मध्ये इंग्लंडचा पहिला फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.