फोटो सौजन्य - Australia Cricket सोशल मीडिया
मार्कस स्टॉइनिसची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध दोन सामान्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आता ऑस्ट्रेलियन संघाच्या क्रिकेट संघामधून मोठी अपडेट समोर आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून मार्कस स्टॉइनिसने निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्टोइनिसची निवड करण्यात आली. पण त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
या महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टोइनिसचा कांगारू संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याने निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर, कांगारू संघाच्या समस्या आणखी वाढल्या आहेत, जिथे संघ आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे.
Marcus Stoinis has announced an immediate retirement from ODI cricket despite being selected to play in the Champions Trophy. It means that Australia will need as many as four replacements following the withdrawal of Mitch Marsh as well as potentially Cummins and Hazlewood. pic.twitter.com/VQUi3qtKaK — 🏏Flashscore Cricket (@FlashCric) February 6, 2025
टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी केली. २०१५ मध्ये पदार्पण केल्यापासून स्टोइनिसने ७१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. निवृत्तीबद्दल स्टोइनिस म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता आणि या फॉरमॅटमध्ये घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट मी नेहमीच जपून ठेवेन.
Champions Trophy मध्ये भारतीय अंपायर नसणार, नितीन मेनननंतर हा मॅच रेफरीही पाकिस्तानला जाणार नाही
तो पुढे म्हणाला, ‘हा निर्णय सोपा नव्हता, पण मला वाटते की एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे.’ माझे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि मी त्यांच्या पाठिंब्याबद्दल खरोखर आभारी आहे.”
जर आपण त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, या फॉरमॅटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी २०१७ मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होती, जिथे त्याने १४६ धावांची तुफानी खेळी खेळली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूने या फॉरमॅटमध्ये १४९५ धावा केल्या आणि गोलंदाजीत ४८ विकेट्सही घेतल्या.
स्टोइनिस २०१८-१९ मध्ये वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू होता आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचाही तो भाग होता, जिथे संघाने अंतिम सामन्यात भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून विजेतेपद जिंकले.