फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अपडेट : २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. तर भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. या चॅम्पियन ट्रॉफीचे पाकिस्तानकडे आहे. भारताचा संघ सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानला जाणार नाही. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी कोणत्याही भारतीय सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी आहेत, तर नितीन मेनन हे आयसीसी एलिट पॅनेलचे पंच आहेत. टीओआयच्या वृत्तानुसार, मेनन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे आणि आयसीसीच्या तटस्थ पंच धोरणानुसार ते दुबईमध्ये पंच म्हणून काम करू शकत नाहीत.
विराट कोहलीचं आणखी एका सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमावर लक्ष्य, असे करणारा जगातील पहिला फलंदाज!
वास्तविक, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सामनाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये तीन सामनाधिकारी आणि १२ पंचांचा समावेश आहे. अनुभवी पंच रिचर्ड केटलबरो, ख्रिस गॅफनी, कुमार धर्मसेना, रिचर्ड इलिंगवर्थ, पॉल रीफेल आणि रॉड टकर यांनीही २०१७ च्या आवृत्तीत पंच म्हणून काम पाहिले आहे. ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, श्रीलंकेचे रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेचे अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी, बून यांनी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, मदुगले यांनी २०१३ च्या अंतिम फेरीत आणि पायक्रॉफ्ट यांनी २०१७ च्या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले.
श्रीनाथ सध्या व्हाईट-बॉल मालिकेत (IND Vs ENG) मॅच रेफ्रीची भूमिका बजावत आहेत. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीकडे रजा मागितली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रीनाथ म्हणाले की, “हो, मी आयसीसीकडून रजा मागितली आहे कारण मी बराच काळ (नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी) घरी गेलो नाही.” आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन सदस्यीय रेफरी संघात डेव्हिड बून, रंजन मदुगले आणि अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांचा समावेश आहे. हे सर्व एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीजचे सदस्य आहेत. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या १२ पंच आणि ३ सामनाधिकारींच्या यादीतून श्रीनाथ आणि मेनन दोघांचीही नावे गायब होती. आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीजमध्ये श्रीनाथ हा एकमेव भारतीय आहे तर आयसीसी एलिट पॅनेल ऑफ पंचांमध्ये मेनन हा एकमेव भारतीय आहे.
कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, अहसान रझा, पॉल रीफेल, शराफुद्दौला इब्ने शाहिद, रॉडनी टकर, अॅलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन.
अंपायर : डेव्हिड बून, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट.