Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs ENG : ‘आता पुढचा मार्ग कठीण..’, एकदिवसीय सामन्यात विक्रम रचणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झला सतावतेय चिंता

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या संघाला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जिंकून दिले. तसेच त्याने विक्रम देखील रचले आहेत, परंतु तो आता भीती बाळगू लागला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 07:55 PM
SA vs ENG: 'The road ahead is difficult now..', Matthew Breitz, who set a record in ODIs, is worried

SA vs ENG: 'The road ahead is difficult now..', Matthew Breitz, who set a record in ODIs, is worried

Follow Us
Close
Follow Us:

Matthew Breitz is worried : दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या एकदिवसीय सामन्यातील पदार्पणापासून खेळलेल्या पाच डावांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. ब्रीट्झके एकदिवसीय सामन्यातील पहिल्या पाच डावांमध्ये अर्धशतक झळकवणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. यासह, तो पहिल्या पाच डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७७ चेंडूत ८५ धावांची तुफानी पारी खेळली. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ८ गमावून गमावत ३३० धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ३२५ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने ५ धावांनी विजय मिळवला. मॅथ्यू ब्रीट्झकेने आतापर्यंत ९२.६० च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत.

हेही वाचा : SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी

अन्यथा त्याचे नाव लॉर्ड्सच्या.. : मॅथ्यू ब्रीट्झके

मॅथ्यू ब्रीट्झकेने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची खेळी साकारली. त्यानंतर त्याने ८३, ५७ आणि ८८ धावांच्या खेळी खेळल्या आहेत. मॅथ्यू ब्रीट्झके त्याच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ८५ धावा काढून अनेक विक्रमांची नोंद केली. ब्रिट्झकेने मस्करी करत म्हटले की, त्याची सुरुवात खूप चांगली झाली असून त्यामुळे आता पुढचा मार्ग थोडा कठीण असण्याची शक्यता आहे.  तो असे देखील म्हणाला की त्याला आशा आहे की भविष्यात देखील त्याचा चांगला फॉर्म कायम असणार आहे. पण तो फक्त १५ धावांनी शतक झळकावू शकला नाही याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. अन्यथा त्याचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर लिहिण्यात आले असते.

ब्रीट्झके पुढे म्हणाला की, पुढचा मार्ग खाली जाण्याची भीती वाटते आहे. आतापर्यंतची सुरुवात खूप खास राहिली आहे. “मी चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळलो आहे आणि भविष्यात देखील सर्वकाही चांगलेच राहावे अशी मी प्रार्थना करत आहे. खरे सांगायचे तर, मी शतक झळकावू शकलो नाही याबद्दल मी खूप नाराज झालो होतो, कारण लॉर्ड्सच्या बोर्डवर माझे नाव असणे खरोखरच विशेष राहिली असते.”

सततच्या सामन्यांनी थकवा जाणवतो..

मॅथ्यू ब्रीट्झकेकडून कबूल करण्यात आले की, सतत सामने खेळल्यामुळे त्याला थकवा जाणवू लागला आहे. परंतु व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल तो त्याबाबत कृतज्ञ आहे. तो म्हणतो की, “कधीकधी या सर्व गोष्टींमुळे तो खूप थकून जातो. पण मी याकडे अशा प्रकारे पाहत असतो की क्रिकेटसारख्या खेळाला माझा व्यवसाय बनवल्याबद्दल मी खूप भाग्यवान असून मी प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा  घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण हे सर्व कायमचे टिकणारे नाही.”

हेही वाचा : ‘यशासोबत कोणी मित्र नसतो, तुम्ही एकटे…’, युवराज-विराटच्या मैत्रीवर योगराज सिंग यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

 

Web Title: Matthew breitz who set a record in the sa vs eng odi match is worried

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • England vs South Africa
  • SA vs ENG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.